Viral Video: रस्त्यावरून जाताना दुचाकीने प्रवास करताना डोक्यावर हेल्मेट घालणे अत्यंत गरजेचं आहे. हेल्मेट वाहनचालकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हेल्मेट घातले नाही तर दुचाकी चालकांना दंड भरावा लागतो. गाडी चालवताना वेग मर्यादा, सिग्नल्स, लेन मार्किंग, हेल्मेट घालणे आदी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पण, अनेक जण गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे, मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे आदी गोष्टी करताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात चक्क एक तरुण पुलावर असलेल्या दुभाजकावर बाईक चालवताना दिसून आला आहे.

व्हायरल व्हिडीओ एका दुचाकीस्वाराचा आहे. एका नदीच्या पुलावरून अनेक गाड्यांची ये-जा सुरु असते. पण, या सगळ्यात एक दुचाकीस्वार सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण – एक तरुण चक्क नदीच्या पुलावर असलेल्या दुभाजकावरुन गाडी चालवताना दिसला आहे. तसेच तुम्ही नीट निरखून पहिले तर तुम्हाला दिसेल की, या तरुणाने हेल्मेट सुद्धा घातलेलं नाही आहे. त्यामुळे त्याने वाहतुकीच्या सगळ्यांच नियमांचे उल्लंघन केलं आहे ; असे म्हणायला हरकत नाही. एकदा पाहाच बेपर्वा वाहन चालवणाऱ्या तरुणाचा व्हायरल व्हिडीओ.

हेही वाचा…बापरे! लिफ्ट थांबवण्यासाठी हात पुढे केला अन्… चिमुकल्याचा हा VIDEO पाहून तुम्हालाही फुटेल घाम

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत पाहिलं असेल की, सहप्रवासी सुद्धा तरुणाचा हा स्टंट पाहून थक्क झाले आहेत आणि प्रवाशाकडे आश्चर्याने पाहताना दिसत आहेत. ही घटना २३ मे रोजी घडली आहे ; असे सांगण्यात येत आहे. या परिसरात स्थानिक सण साजरा केला जात होता. तसेच या पुलावर मिरवणूक काढली जात होती. पुलावर प्रचंड गर्दी होईल यासाठी गाड्यांनी पुलावरून येऊ नये म्हणून असा प्रतिबंध घालण्यात आला होता. नेहमीचा मार्ग बंद केल्यामुळे तरुणाने हा भलताच मार्ग शोधून काढला आणि पुलावर असलेल्या दुभाजकावरुन थेट गाडी चढवली आणि चालवण्यास सुरुवात केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच व्हायरल व्हिडीओतील हा पूल ८०० मीटर लांबीचा आहे ; असे म्हटले जाते आहे. सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @rajtweets10 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तरुण कसलीही भीती न बाळगता बेपर्वा गाडी चालवताना दिसत आहे ; जे पाहून तुम्हालाही नवल वाटेल. पुलावरून जाण्यास निर्बंध घातलेले असूनही तरुणाचे भलतेचं धाडस दाखवले. तेथे उपस्थित एका अज्ञात प्रवाशाने हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करून घेतला आणि सोशल मीडियावर शेअर केला ; जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.