सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हायरल व्हिडीओ अनेक प्रकारचे असतात. यामधले प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. हा व्हायरल व्हिडीओ एका मुलाचा आहे. जो सापांसोबत खेळत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगा तीन कोब्रांसमोर बसलेला दिसत आहे. या तिन्ही सापांना फणा पसरवला आहे. तर दुसरीकडे तो एका सापाला पडकण्याचा प्रयत्न करत आहे. तिन्ही साप एकाच स्टाईलमध्ये बसल्याचे पाहिल्यानंतर तो मुलगा त्याचे हात आणि पाय हलवू लागतो. ते पाहिल्यानंतर सापही ते कॉपी करू लागतात. याच दरम्यान, एक साप त्या मुलाच्या गुडघ्याला चावा घेतो. तर तो मुलगा स्वत:ला वाचवण्यासाठी लगेच त्या सापाला पकडतो.

आणखी वाचा : “बिकिनी परिधान केल्यानंतर मला मराठी चित्रपटसृष्टीत…”, सई ताम्हणकरने केला खुलासा

आणखी वाचा : “राज साहेबांनी ‘ते’ २ दिवसात करून दाखवलं…”, The Kashmir Files प्रकरणावरून केआरकेचा कॉंग्रेसला टोला

आणखी वाचा : “हास्यजत्रेच्या तिसऱ्या एपिसोडच्या शूटच्यावेळी प्रेग्नेंसी विषयी कळले आणि…”, नम्रता संभेरावने केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत एका नेटकरी म्हणाला, “नेहमी स्मार्ट होण्याचा प्रयत्न करू नका. या क्लिपसोबत त्या नेटकऱ्याने ‘महाराष्ट्र फॉरेस्ट’ला ही टॅग केले आहे. तर एका दुसऱ्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर करत दावा केला आहेकी, की “हा व्हिडीओ आणि फोटो शेअर करत मला कोणी तरी सांगितले की हा व्हिडीओ कर्नाटकातील एका स्टंटमॅनचा आहे.” मात्र, नक्की हा व्हिडीओ कुठला आणि कधीचा आहे हे अद्याप समोर आलेले नाही.