Viral Video: चित्रपट-मालिकांमध्ये अनेकदा कार, बाईक यांच्या मदतीने ॲक्शन सीन शूट केले जातात. पण, हे स्टंट खरे नसतात. ही दृश्ये मोठ्या पडद्यावर आकर्षित दिसावी म्हणून चित्रित केली जातात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती दोन वेगवान कारवर उभी राहून धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. हा स्टंट नेमका कसा पूर्ण केला, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

व्हायरल व्हिडीओ परदेशातला आहे. एक तरुण हेल्मेट, हातमोजे, गॉगल, मनगट आणि गुडघ्याला पट्टा बांधून स्टंट करण्यासाठी पूर्णपणे तयारीत दिसत आहे. हे सर्व रेकॉर्डही केलं जात आहे. जसजसा व्हिडीओ पुढे जातो, तसं तरुण दोन वेगवान कारच्यावर उभा राहतो. जेव्हा दोन्ही कार तिसऱ्या कारपर्यंत पोहोचतात, तेव्हा तो वेगाने त्या तिसऱ्या कारच्या दिशेने उडी मारतो. तिसऱ्या गाडीत एक चालक बसलेला दिसतो आहे. तरुण उडी घेण्यात यशस्वी झाला का? त्याचा स्टंट पूर्ण झाला का, व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Little Boy injured While Playing On Swing shocking video
VIDEO: झोक्याचा वेग वाढत गेला अन् चिमुकला थेट…एक चूक अशी जीवावर बेतली; पालकांनो मुलांना गार्डनमध्ये एकटं सोडू नका
Lion attack on man shocking video goes viral
‘आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?’ सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO बघून झोप उडेल
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
a young guy proposed a girl but she rejected him and ran away
भररस्त्यात प्रपोज करताच मुलगी पळाली अन् तरुण ढसा ढसा रडला, शेवटी लोकांनी दिला धीर; पाहा VIDEO
young woman was coming down the stairs her foot slipped and she fell directly into the valley
‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ पायऱ्या उतरत होती तरुणी, पाय घसरला अन् थेट दरीत…,थरारक घटनेचा Video Viral
Two robbers returned valuables to a delivery boy after he broke into tears video
चक्क चोरांनी दाखवली माणुसकी; मुलगा रडायला लागताच चोरीचं सामान केलं परत, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

हेही वाचा…‘येथे पोलीस असतात…’ गूगल मॅपने दाखवलं ट्रॅफिक पोलिसांचं थेट लोकेशन; व्हायरल पोस्टची सोशल मीडियावर चर्चा

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एका मोकळ्या, अरुंद रस्त्यावरून तीन गाड्या जात आहेत. तरुण दोन वेगवान कारच्या मधोमध उभा राहतो. जेव्हा दोन्ही कार तिसऱ्या कारपर्यंत पोहचतात तेव्हा तरुण तिसऱ्या गाडीत उडी मारतो. उडी मारणाऱ्या तरुणाचा पाय कारचालकाच्या डोक्याला लागतो. पण, तरुण स्टंट करतो आहे याची त्याला आधीपासूनच कल्पना असते. तर अशाप्रकारे कुठलीही इजा न होता तरुणाने हा स्टंट यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे आणि येथेच व्हिडीओचा शेवट झाला.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @chebotarev_life या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही जणांनी या स्टंटचे कौतुक केले, तर अनेकांनी चिंता व्यक्त केली. हा व्हिडीओ सुमारे ३० दशलक्ष लोकांनी पाहिला आहे आणि १.४ दशलक्ष लोकांनी लाइकसुद्धा केला आहे. अनेकांनी पोस्टवर कमेंटदेखील केल्या आहेत. त्यांनी तरुणाच्या स्टंटची प्रशंसा केली, तर अनेकांनी त्याच्याबद्दल आणि चालकाबद्दल चिंता व्यक्त केली. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.