सोशल मीडियावर चोरीच्या घटनेचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो हरियाणातील रेवाडी येथील असल्याचा सांगितला जात आहे. जिथे एका मंदिराच्या दानपेटीतून एक चोर पैसे लंपास करताना दिसत आहे. मात्र मंदिरात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरट्याच्या सर्व हालचाली कैद झाल्या आहेत. जे पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. चोरी करण्यापूर्वी चोर एक नाटक करतो, सर्व प्रथम तो मंदिरात प्रवेश करतो, यानंतर इकडे तिकडे पाहतो. जमिनीवर बसून काहीवेळ हनुमान चालीसा पठन करतो. यावेळी तो दानपेटीत १० रुपयेही दान करतो. नंतर मंदिरात येणाऱ्या- जाणाऱ्यांची संख्या कमी झाल्यानंतर तो मंदिरातील दानपेठी चतुराईने रिकामी करतो.

ही घटना रेवाडीतील धरुहेडा शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराशी संबंधित आहे. ९ जुलै रोजी रात्री एक चोर आला आणि मंदिरात बसला आणि यानंतर नाट्यमय पद्धतीने चोरी केली. या घटनेचा व्हिडीओ Abhay नावाच्या युजरने फेसबुकवर पोस्ट केला असून त्यावर रेवाडीच्या मंदिरात चोरी असे लिहिले आहे. व्हायरल क्लिपमध्ये ती व्यक्ती दानपेटीच्या अगदी जवळ बसलेला दिसत आहे. यावेळी तो प्रथम हनुमान चालीसेचे पुस्तक उचलतो आणि आजूबाजूच्या लोकांकडे बघत हनुमान चालीसा पठण करु लागतो. यानंतर दिवा लागतो आणि १० रुपये अर्पण करतो. मंदिरात १ -२ भक्त राहतात तेव्हा तो दानपेटीचे कुलूप तोडतो, भक्त बाहेर पडताच तो दानपेठीत हात खालून मुठभर नोटा घेतो आणि खिशात खालून फरार होतो.

या चोरीची माहिती नसल्याने पुजारी नेहमीप्रमाणे रामनिवास मंदिराचे दरवाजे रात्री बंद करून घरी जात गेले, पण सकाळी मंदिर उघडून साफसफाई करत असताना त्यांना दानपेटीचे कुलूप तुडलेले दिसले. यानंतर त्यांनी तत्काळ मंदिर समितीला याची माहिती दिली आण पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे.