अनेकांचा पाळीव प्राण्यांवर जीव असतो. घरात असलेल्या पाळीव प्राण्यांना घरातील एक सदस्य समजुन त्यांची काळजी घेतली जाते, त्यांना हव्या त्या सर्व गोष्टी पुरवल्या जातात. हे प्राणीदेखील घरातल्यांना तितकाच जीव लावतात. घरातल्यांची नक्कल करतानाचे किंवा घरातल्यांवर एखाद्या गोष्टीवरून चिडल्याचे प्राण्यांचे अनेक गोंडस व्हिडीओ व्हायरल होत असतात. तर काहीजण त्यांना हात कसा मिळवायचा, घरात कोणी नसताना स्वतःसाठी अन्न कसे घ्यायचे, वेगवेगळे खेळ कसे खेळायचे अशा अनेक गोष्टी शिकवतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एली गोल्डन लाईफ’ या इन्स्टाग्रॅम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याच्या कुत्र्याला फ्रिज कसा उघडायचा हे शिकवत आहे. फ्रिजच्या दाराला दोरी बांधून ती दोरी तोंडाने खेचायची असे कुत्र्याला शिकवले जाते. थोड्यावेळाने जेव्हा तो व्यक्ती कुत्रा काय करतोय हे पाहायला येतो, तेव्हा दुसऱ्या कुत्र्याबरोबर फ्रिजमधील चॉकलेट काढत असल्याचे दिसते. म्हणजे आता फ्रिजमधील सर्व वस्तु कुत्रा कधीही आरामात घेऊ शकतो आणि मनसोक्त आस्वाद घेऊ शकतो हे त्याच्या लक्षात येते. पाहा हा व्हायरल व्हिडिओ.

आणखी वाचा : “कारण देवाने तुमच्यासाठी…”; आयएएस अधिकाऱ्यांनी शेअर केलेला जीवनाचा अमूल्य अर्थ सांगणारा फोटो चर्चेत

व्हायरल व्हिडीओ :

कुत्र्याला फ्रिज कसा उघडायचा हे शिकवतानाचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडला असून, या व्हिडीओला आत्तापर्यंत ३० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man teaches his dog how to open fridge what happens next will amuse you watch this viral video pns
First published on: 15-10-2022 at 09:39 IST