सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्याला पोट धरून हसायला लावणारे तर काही थक्क करणारे असतात. यात प्राण्यांचेही बरेच व्हिडीओ असतात. वाघ, सिंह, बिबट्या अशा रानटी प्राण्यांचे इतर प्राण्यांवर, माणसांवर हल्ला करतानाचे व्हिडीओही सोशल मीडियावर पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पिंजऱ्यात बंद असणाऱ्या सिंहाने तिथे आलेल्या पर्यटकाला जन्माची अद्दल घडवली आहे. नेमकं काय झालं जाणून घ्या.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये काही सिंह पिंजऱ्यात कैद असलेले दिसत आहेत. या प्राण्यांना पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांपैकी एक माणूस तिथल्या सिंहाच्या जवळ उभा राहत त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागतो. यावर तो सिंह चिडतो आणि त्या माणसाच्या हाताचा चावा घेतो. यावर तिथे उपस्थित सगळे घाबरतात आणि हाताला चावा घेतलेला व्यक्तीला तिथून बाजुला करण्याचा प्रयत्न करतात. पाहा व्हायरल व्हिडीओ.

आणखी वाचा: मॅच पाहताना चुकीची प्रतिक्रिया दिली अन्…; चिमुकल्याचा गोंडस Viral Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडिओ:

आणखी वाचा: मॅच पाहताना चुकीची प्रतिक्रिया दिली अन्…; चिमुकल्याचा गोंडस Viral Video एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क झाले असून, काहींनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सिंहासारख्या रानटी प्राण्यापासून लांब राहावे, अशावेळी सुरक्षित अंतर राखणे गरजेचे असते असा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.