तुमच्यासोबतही अनेकदा असे घडले असेल, तुम्हाला लवकर कुठेतरी पोहोचायचे असते पण वाटेत तुमच्या बाईकमधील पेट्रोल संपते. यावेळी तुम्हाला खूप राग येतो, यावेळी रस्त्याने जाणाऱ्या कोणाला तरी तुम्ही बाईकला धक्का देत पेट्रोल पंपापर्यंत घेऊन जाण्याची विनंती करतात. किंवा वाटेत तुम्ही कोणतरी पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोलची बाटली भरून आणून देतो, पण अनेकदा पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल भरून देण्यास नकार देतो. अशावेळी काय करायचे असे प्रश्न पडतो. असा प्रकार तुमच्याबाबतीतही अनेकदा असे घडले असेल. पण याच गोष्टीने वैतागलेल्या एका तरुणाने अनोखा जुगाड केला आहे. जो पाहून तुम्हालाही हसू आवरणे अवघड होईल.
पेट्रोलचे दर इतके वाढले आहेत की आता बाटलीत कोणी पेट्रोल द्यायला मागत नाही. यामुळे तरुणाने डोकं वापर एक वेगळी युक्ती लढवली, त्याने पेट्रोल पंपावर बाटली न नेता अशी एक वस्तू नेली ज्यात पेट्रोल भरून देण्यास पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनाही नकार देऊ शकला नाही.
ग्लासावर- ग्लास त्यावर सिलिंडर, सिलिंडरवर हंडे; तरुणाची खतरनाक स्टंटबाजी; पाहा Video
सायकलवर बाईकची टाकी घेऊन पोहचला पेट्रोल पंपावर
हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समजू शकले नसले तरी तो मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पेट्रोल पंपावर एक तरुण उभा असलेला दिसतोय. यावेळी पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल मिळणार नाही असे पोस्टर चिकटवलेले दिसत आहे. त्यामुळे ती व्यक्ती त्याच्या सायकलच्या मागे चक्क बाईकची टाकी घेऊन आलेला दिसतोय.
@Raajeev_Chopra नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात पेट्रोलसाठी हा अनोखा जुगाड व्हिडीओ पाहून युजर्सना आता हसू आवरणे अवघड झाले आहे. या व्हिडीओवर आता युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहे. एका युजरने लिहिले की, पेट्रोलमध्ये किती भेसळ आहे हे कळू नये म्हणून लोकांना बाटलीत पेट्रोल दिले जात नाही. तर काहींनी लिहिले की, हे निषिद्ध आहे, म्हणूनच बाटलीत पेट्रोल दिले जात नाही.