Ram Mandir : सध्या आपल्याला सगळीकडे पुन्हा एकदा दिवाळी असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. त्याचे कारणही अगदी खास आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये २२ जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि मंदिराचे भव्य स्वरूपात उद्घाटन होणार आहे. हे उद्घाटन देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने देशातील नागरिकांना त्या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खरे तर प्रभू श्रीरामाच्या या सोहळ्याची सुरुवात सोशल मीडियावर सुरू झालेली आहे. अनेकांनी त्यांच्यातील विविध कलागुणांचे प्रदर्शन करीत श्रीरामाला वंदन केले आहे. त्यामध्ये काहींनी गाणी गायली आहेत, काहींनी चित्रकलेतून रामाचे सुरेख असे चित्र रेखाटले आहे, तर कुणी एखादे वाद्य वाजवून दाखवले आहे. नुकताच बिस्किटांच्या एका कलाकृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये एका व्यक्तीने पार्ले-जी बिस्किटांपासून चक्क राम मंदिराची प्रतिकृती तयार केली होते. असे कितीतरी व्हिडीओ सध्या चांगलेच ट्रेंडिंग आहेत.

हेही वाचा : Viral video : वडापाव या पदार्थाला इंग्रजीत काय म्हणतात? पाहा, या चिमुकलीचे उत्तर ऐकून पोटधरून हसाल…

त्यामध्ये अजून एका व्हिडीओची हॉलीवूडच्या सिनेमातील स्पायडरमॅन या एका पात्राने घातली आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @gitaquest नावाच्या अकाउंटने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये स्पायडरमॅनसारखे कपडे घालून, एक तबलावादक तबल्यासमोर बसला आहे. त्याच्यामागे प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता आणि गुडघ्यावर बसून तिघांना नमस्कार करणारा हनुमान, असे एक चित्र लावलेले आहे. या व्हिडीओमध्ये वादक, ‘हमारे साथ श्री रघुनाथ तो, किस बात की चिंता’ या मंत्रमुग्ध करणाऱ्या रामाच्या भजनावर आपल्याला ठेका धरायला लावणारा तबला वाजवत आहे. या कलाकाराचे नाव अमन पाल, असे आहे. “प्रत्येक सुपरहीरोची भक्ती हीच त्याची शक्ती आहे,” अशी कॅप्शन व्हिडीओला या देण्यात आली आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पाहा.

“स्पायडरमॅन – वे टू अयोध्या,” असे एकाने लिहिले आहे. दुसऱ्याने, “सुपर हीरोलादेखील महापुरुष कोण आहे हे माहीत आहे,” असे लिहून नमस्काराची इमोजी टाकली आहे. तिसऱ्याने, “मार्व्हल घराण्याचे उस्ताद, पीटर परिहार,” असे तिसऱ्याने लिहिले आहे. चौथ्याने, “जय श्रीराम” असे लिहून नमस्कार केला आहे. तर शेवटी पाचव्याने, “कितीही शक्ती किंवा सुपरपॉवर असली तरीही रामभक्तीपलीकडे काहीही नाही,” असे लिहिले आहे.

हेही वाचा : Viral video : गूळ कसा तयार होतो? प्रक्रिया पाहून नेटकरी म्हणाले “व्हिडीओ पाहताना तर….”

View this post on Instagram

A post shared by ???? ?????™ (@gitaquest)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओला आतापर्यंत ७७६K इतके व्ह्युज आणि १२०K लाइक्स मिळाले आहेत.