How Man Wins 8 Crore Lottery: एखाद्याचा नशीब जोरदार असेल तर कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना व्हायचा लाभ काही थांबवता येत नाही. असाच काहीसा प्रकार सध्या एका व्यक्तीच्या आयुष्यात घडला. आजूबाजूच्यांना पूर्ण प्रयत्न करूनही त्याने आपली इच्छा पूर्ण केलीच आणि त्यातून त्याला चक्क १ मिलियन डॉलर म्हणजेच ८ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. 500X द कॅश” स्क्रॅच-ऑफ लॉटरी गेमसाठी उभ्या असणाऱ्या या एका व्यक्तीला त्याच रांगेतील इतरांनी रांगेत चुकीच्या पद्धतीने मागे ढकलून दिले होते. पण त्याचे नशीब इतके चांगले होते की अखेरीस त्याने लॉटरी जिंकल्याचे समजत आहे.

डेलरे बीचचे स्टीफन मुनोझ एस्पिनोझा यांनी फ्लोरिडा लॉटरी अधिकार्‍यांना आपल्या अनुभवाविषयी तक्रार केली. दिवसभर खूप काम करून थकल्यावर मी पब्लिक्स येथे मशीनवर लॉटरीचे तिकीट खरेदी करणार होतो तेव्हा एक माणूस आला आणि दादागिरी करून मला मागे ढकलून पुढे उभा राहिला. यानंतरही मी तक्रार करण्यापेक्षा जिद्दीने आधी तिकीट खरेदी करण्याचे ठरवले. जेव्हा एस्पिनोझाने त्याचे तिकीट स्क्रॅच केले तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही कारण तो चक्क एक मिलियन डॉलर जिंकला होता.

गेल्या फेब्रुवारीमध्ये लॉन्च झालेल्या गेमच्या ५० डॉलरचं तिकिटावर त्याने तब्बल ८ कोटी आणि १६ लाख रुपये जिंकले. फ्लोरिडा राज्य लॉटरीनुसार, १ मिलियन डॉलरचे बक्षीस जिंकण्याची शक्यता २ कोटी ६७ लाख, ७३९ जणांमध्ये एखाद्याचीच असते. या लॉटरीमध्ये १०० डॉलरपासून बक्षिसे सुरु होतात व २५ मिलियनचा जॅकपॉट आहे.

हे ही वाचा<< १६ डोसे हातात घेऊन निघाला वेटर अन्.. असं काही घडलं की थेट आनंद महिंद्रांनी Video केला शेअर, पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, एस्पिनोझाने जिंकलेली रक्कम एकरक्कमी स्वीकारून आपल्या कुटुंबासाठी घर खरेदी करण्याचे ठरवले आहे. यापूर्वी मिशिगन मधील एका व्यक्तीला ५ डॉलरच्या तिकिटावर ८७ लाखांची लॉटरी लागली होती.