देशभरामध्ये दिवाळी सण उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जाता आहे. दिवाळीनिमित्त अनेक लोक गावी निघाले आहेत. हायवेवर गावी जाणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाल्याचे दिसते आहे. शनिवार-रविवार आणि दिवाळी एकापाठोपाठ आल्याने संपूर्ण भारतातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. गर्दीने भरलेल्या रेल्वे गाड्यांमधून लोक प्रवास करताना दिसत आहे. दरम्यान सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामुळे भारतीय रेल्वे प्रशानसाच्या कामावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रवाशांच्या गर्दीने भरलेल्या रेल्वेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशाच एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गर्दीने भरलेल्या रेल्वेच्या डब्यात आत घुसण्याचा प्रयत्न करतो पण अखेर अयशस्वी ठरतो. प्रवाशांची गर्दीच इतकी आहे की खूप प्रयत्न करूनही त्याला रेल्वेमध्ये शिरता येत नाही.

व्हायरल व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलेला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एका रेल्वे डब्यात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. प्रवासी दारात लटकले आहेत. ट्रेनच्या एका दारात सुमारे १० लोकांनी गर्दी केली कारण ते सर्वजण आत बसण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान एक प्रवासी डब्यात शिरण्यासाठी रेलिंगला लटकतो आहे. लोकांच्या डोक्यावरून रेल्वेच्या दरवाजाल्या लटकून आत जाण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर, त्या व्यक्तीने अखेर हार मानली आणि तो खाली उतरला कारण आसपासचे लोक त्याच्यावर हसत होते.

हेही वाचा – निस्वार्थ प्रेम! तरुणीला सासरी जाताना पाहून निरागस पाळीव कुत्र्याने पकडला तिचा पदर, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ

दिवाळीमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी हा भारतीय रेल्वे प्रवासामध्ये मोठा अडथळा ठरत आहे. बरेच लोक सणासाठी त्यांच्या गावी जात असल्याने मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वे अतिरिक्त गाड्या सोडते आणि चालू गाड्यांचे वेळापत्रक वाढवते. पण गाड्यांच्या संख्या आणि फेऱ्या वाढवूनही प्रवाशांसाठी ही सोय कमीच पडते आहे.

हेही वाचा – दुचाकी चालवताना कंबर दुखू नये म्हणून तरुणाने केला हटके जुगाड; पाहा व्हायरल व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी दिवाळीच्या पूर्वसंध्येला, गुजरातच्या वडोदरा येथील एका प्रवाशाने X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, कन्फर्म तिकीट असूनही तो ट्रेनमध्ये चढू शकला नाही. त्याला ट्रेनमधून बाहेर ढकलण्याl आले आणि पोलिसांनी या परिस्थितीत कोणतीही मदत केली नाही. त्याच दिवशी गुजरातमधील सुरत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन एकाचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. दिवाळीसाठी आपल्या मूळ गावी जाणाऱ्या लोकांची मोठी गर्दी स्टेशनवर जमल्यानंतर लोकांनी ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी झाली होती. या सर्व घटनांमुळे रेल्वे प्रशासनाच्या कामावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.