एकीकडे लोक चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, तर दुसरीकडे नोकरीवर असणारे लोक नोकरी सोडण्याचा निर्णय घेत आहेत. यामागे अनेक कारणं सांगितली जातात. यात अनेक कर्मचारी त्यांच्या नोकरीत समाधानी नाहीत. वर्क प्रेशरमुळे कर्मचारी नोकरीला कंटाळलेत. बहुतांश कर्मचारी बिझी शेड्युलमुळे आपल्या नोकरीतील समाधान, आनंद, शांतता राखण्यात कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत काही लोकांना नोकरी सोडणे हाच एकमेव चांगला पर्याय वाटत आहे. अलीकडे एका व्हायरल झालेल्या रेजिग्नेशन लेटरमध्ये एका कर्मचाऱ्याने मोजक्या शब्दात आपल्या नोकरी प्रतीच्या वेदना व्यक्त केली आहे. ज्या उद्योगपती हर्ष गोएंका यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केली आहे.

नोकरीला कंटाळलेल्या कर्मचाऱ्याचे रेजिग्नेशन लेटर व्हायरल

कर्मचाऱ्याचे हे रेजिग्नेशन लेटर आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. हे लेटर आता उद्योगपती हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. या रेजिग्नेशन लेटरमध्ये कर्मचाऱ्याने लिहिले आहे की, ‘डिअर हर्ष, मी राजीनामा देत आहे, मजा नाही येतयं, तुझा राजेश….’ अनेक कर्मचारी कार्यालयीन भाषेत मेलद्वारे किंवा लेखी स्वरुपात आपले रेजिग्नेशन लेटर कंपनीकडे सुपूर्द करतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा राजीनामा अगदी मोजक्या आणि सोप्या शब्दात लिहिलेला आहे. ज्यात कर्मचाऱ्याने आडेवेडे न घेता राजीनामा देण्यामागचे खरे कारण सांगितले आहे. हे रेजिग्नेशन लेटर शेअर करत हर्ष गोएंका यांनी लिहिले की, ‘हे लेटर लहान आहे पण खूप खोल विचार करायला लावणारे आहे. ही एक गंभीर समस्या आहे, जी आपण सर्वांनी सोडवली पाहिजे. या रेजिग्नेशन लेटरचा स्क्रीनशॉट हर्ष गोएंका यांनी ट्विटरवर तसेच लिंक्डइनवर शेअर केला आहे.

आधी दिली जंगी पार्टी, मग केली नोकरीवरून हकालपट्टी; ‘या’ कंपनीच्या निर्णयामुळे १३ टक्के कर्मचारी बेरोजगार

उद्योगपती हर्ष गोएंका सोशल मीडियावर अनेक अजब – गजब पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या अनेक पोस्ट्स इतक्या फनी असतात की काही मिनिटांतच त्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. अलीकडेच त्यांनी राजेश नावाच्या कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा दिला, त्याच्या रेजिग्नेशन लेटरचा फोटो शेअर केला आहे. जो पाहून अनेकांनीच आश्चर्य व्यक्त केले. त्याने शेअर केलेल्या या पोस्टला २ हजारांहून अधिक युजर्सनी लाईक केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांनी शेअर केलेल्या रेजिग्नेशन लेटर पोस्टवर १८ जून ही तारीख लिहिली आहे. या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट्स देखील केल्या आहेत. काही युजर्स म्हणतयं की, ‘टू द पॉइंट’ बोलणारा दिसतोय, तर काहींनी प्रश्न उपस्थित केला की, त्याने कोणत्या कारणासाठी नोकरी सोडली? त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ‘रेजिग्नेशन लेटर लिहिणारी व्यक्ती स्ट्रेट फॉरवर्ड आहे’. त्याचवेळी आणखी एका युजरने म्हटले की, ‘हे रेजिग्नेशन लेटर एक्सप्लेन करण्याची गरज नाही.’ तर आणखी एक युजरने म्हटले की, ‘देव प्रत्येकाला अशी वृत्ती देवो.’