सोशल मीडिया हे मजेदार व्हिडीओचा खजिना आहे. इथे तुम्हाला कधी काय पाहायला मिळेल हे काही सांगू शकत नाही. खरंतर आपल्याला सोशल मीडियावर असे अनेक जुगाडाचे व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्याला कशाचीच तोड नसते. जुगाडाचे व्हिडीओ लोकांना पाहायला सर्वाधिक आवडते. तसे पाहता भारतात जुगाडू लोकांची कमी नाही, ज्यामुळे असे व्हिडीओ सर्रास तुम्हाला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहिल्यावर तुम्हाला शब्दच सुचणार नाही. जाणून घेऊया नेमकं काय केलं…

आपल्याला हे माहीत आहे की, जुगाडच्या बाबतीत भारतीय लोकांचा हात कोणीही धरू शकत नाही. कारण भारतीय लोक एखादी गोष्ट नाही म्हणून रडत बसत नाहीत. उलट त्या गोष्टीचा पर्याय शोधून आपलं काम पूर्ण करातात. अन् या पर्यायालाच आपण ‘जुगाड’ असं म्हणतो. असाच एक गंमतीशीर जुगाड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा जुगाड पाहून खरंच तुम्ही देखील म्हणाल, “व्वा काय डोकं लावलं आहे.

भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की पाहणारासुद्धा चक्रावून जाईल. असाच एक गमतीशीर जुगाड सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. तुम्ही सर्वांनी तुमच्या घरात पाण्याचा नळ बसवला असेल. याशिवाय पाण्याचा प्रवाह थांबविण्यासाठी कुलूपही बसविले असेल. हे कुलूप तुम्ही मुख्य पाईपमध्ये बसवले असेल, पण या व्हायरल व्हिडीओतील व्यक्ती तुमच्यापेक्षा दोन पावले पुढे गेला. त्या व्यक्तीने चक्क पाण्याच्या नळात चावी लावून कुलूप लावले आहे. आता जेव्हाही कुणाला नळातून पाणी काढायचे असेल तेव्हा त्याला आधी चावी लावावी लागेल आणि नंतर ती फिरवावी लागेल, तरच पाणी बाहेर येईल. यानंतर तुम्ही पुन्हा की चालू करून ते बंद करू शकता.

(हे ही वाचा : लग्नमंडपात स्टेजवरच नवरा-नवरीची तुफान हाणामारी, वरमाला घालताना झटापट, VIDEO पाहून हसून-हसून व्हाल लोटपोट!)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओ येथे पाहा

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर trollgramofficial ऑफिशियल नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. वृत्त लिहिपर्यंत ८४ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून अनेक लोक अवाक झाले. व्यक्तीचा हा जुगाड पाहिल्यानंतर अनेक लोकांनी त्याचं खूप कौतुकही केलं. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, “व्वा, काय डोकं लढवलं आहे.” अनेक युजर्सनी वेगवेगळ्या प्रकारचे इमोजी शेअर करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा जुगाड पाहून तुम्हाला कसं वाटलं, तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.