MHT CET 2023 Admit Card : महाराष्ट्र स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल लवकरचं कॉमन एंट्रन्स टेस्टसाठी (MHT CET 2023) प्रवेशपत्र जारी करणार आहे. उमेदवार सध्या प्रवेश पत्राच्या रिलीजची प्रतिक्षा करत आहेत. प्रवेश पत्र रिलीज होताच उमेदवारांना ते एमएचटीच्या अधिकृत वेबसाईट cetcell.mahacet.org आणि mhtcet2023.mahacet.org यावर जाऊन पाहता येईल, तसेच तिथून डाऊनलोडही करता येईल.

महाराष्ट्र सीईटीच्या वेळापत्रकानुसार, इंजिनिअरिंग, फार्मसी व अ‍ॅग्रीकल्चर अभ्यासक्रमांसाठी ९ ते २० मे दरम्यान प्रवेश परीक्षा घेतली जाईल. तर पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) ग्रुपसाठी ९ ते १३ मे आणि पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) ग्रुपसाठी १५ ते २० मे दरम्यान परीक्षा होणार आहे.

Maharashtra MHT CET admit card: कसे डाउनलोड करायचे?

१) सर्वप्रधम cetcell.mahacet.org वेबसाईटवर जा.

२) आता MHT CET 2023 सेक्शनमध्ये जा.

३) यानंतर MHT CET 2023 admit card ही लिंकला ओपन करा.

४) आता विचारलेली माहिती सबमिट करत लॉग इन करा.

५) अशाप्रकारे MHT CET 2023 चे प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

६) तुम्ही MHT CET 2023 चे प्रवेशपत्र डाऊनलोड करून ठेऊ शकता. पण परीक्षेच्या दिवसासाठी प्रिंटआउट सोबत घेऊन जा.

एमएचटी सीईटी परीक्षा ही इंजिनिअरिंग ( बीई व बीटेक), फार्मसी (पदविका व पदवी फार्मसी) पदवीस्तरावरील अ‍ॅग्रीकल्चर इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी घेतली जाते.