आई आपल्या लहान मुलाचे मनं वळवण्यासाठी अनेक वेगवेगळे प्रयत्न करत असते. बहुतेक लहान मुलं खूप खोडकर असतात जी काही केल्या आपल्या पालकांचेही ऐकत नाहीत. कधी आवडत खेळणं मिळवण्यासाठी , कधी खाण्यासाठी तर कधी कोणत्याही गोष्टींसाठी लहान मुलं हट्टीपणा करतात. अनेकदा आपल्या मुलाचे हट्ट पुरवणे आई-वडिलांचे जगणे अवघड होऊन जाते. तरीही ही लहान मुलं आपला हट्टी स्वभाव काही सोडत नाहीत. अशाच एका खोडकर, हट्टी चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात एक आई चिमुकल्याचे केस कापण्यासाठी भन्नाट जुगाड करते.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आई तिच्या लहान मुलाचे केस कापत असते, यावेळी मुलं स्थिर बसत नसल्याने ती एक अनोखी ट्रीक वापरताना दिसत आहे. ज्यामुळे केस कापताना मुलाला कोणताही दुखापत होत नाही.

आईने अशाप्रकारे कापले मुलाचे केस

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आई एका कार्डबोर्ड बॉक्सवर तीन मोठे छिद्र तयार करते. यानंतर त्यात मुलाला बसवते आणि त्याचे डोके आणि पाय छिद्र केलेल्या जागेतून बाहेर काढते. आता संपूर्ण बॉक्सला चारही बाजूने टेप लावते.

मुलाला बॉक्समध्ये ठेवल्यानंतर आई तिच्या कामाला सुरुवात करते. आई मुलाच्या डोक्यावरील छोटे छोटे केस कापते. बॉक्समध्ये असल्याने चिमुकला क्वचितच हालचाल करु शकतो यामुळे आईला केस कापताना एवढा त्रास होत नाही, यामुळे काही सेकंदातच ती मुलाचे केस कापण्याचे काम पूर्ण करते. यात मुलालाही कोणताही दुखापत होत नाही.

जरी सुरुवातीला चिमुकला बॉक्समध्ये बंदिस्त ठेवल्यामुळे गोंधळून जातो, पण काही वेळाने तो शांत बसतो, यामुळे आईला काही मिनिटात चिमुकल्याच्या डोक्यावरील केस नीट कापता येतात आणि तो चिमुकलाही घराभोवती फिरण्यास मोकळा होतो.

लोकांनी केले कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंटरनेटवरील लोकांनाही आई आणि चिमुकल्यातील हा प्रसंग फार आवडला आहे. आपल्या मुलाची समजूत काढण्यासाठी आईचा हा अनोखा जुगाड पाहून लोक कौतुक करत आहेत.