Viral video: प्रत्येक आई आपल्या मुलांना जिवापाड जपते. प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून ती मुलांचा जीव वाचवते. मग ही आई मनुष्य रूपातली असो किंवा प्राणी. मानवाप्रमाणे प्राणीसुद्धा आपल्या पिल्लांची फार काळजी घेतात. ही गोष्ट अधोरेखित करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ माकडाच्या बाळाचा आहे.एक म्हण आहे की आई आपल्या मुलासाठी जे काही सोसते किंवा करते, त्याचे ऋण ते मूल कधीच फेडू शकत नाही. मनुष्य असो वा प्राणी, हे दोघांनाही लागू होते. आपली पहिली गुरु ही आपली आई असते त्याच प्रमाणे प्राण्यांचीही पहिली गुरु ही त्यांची आईच असते. जेव्हा आपण मस्ती करतो, एखादी चुकीची गोष्ट करतो तेव्हा आपल्याला आई रोखते. कधी कधी तर एक फटकाही पडतो. त्याचप्रमाणे या माकडाच्या पिल्लानेही आईचा मार खाल्लाय. तुम्हालाही हा व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बरीच माकडं यामध्ये दिसत आहेत. छोटी मोठी सगळी माकडे खेळत आहेत. यावेळी एक माकडाचं पिल्लू तोंडात काहीतरी घालतं. आणि हे त्यांची आई पाहते. यावेळी आई पिल्लाचा स्वत:जवळ ओढते एक फटका देते. त्यानं तोंडात घातलेलं बाहेर काढते आणि पुन्हा पिल्लाला कानाखाली मारते. हा व्हिडीओ पाहून हसू अनावर होत आहे. आईचं प्रेम किती नि:स्वार्थ असतं हे या व्हिडिओने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> अशी मोबाईल चोरी कधीच पाहिली नसेल; तरुणीसोबत नेमकं काय घडलं? VIDEO तुफान व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @desimojito या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच लोक याला शेअरही करत आहेत. एका युझरने लिहिले, आई शेवटी आई असते जी स्वत: काहीही सहन करेल मात्र आपल्या मुलासाठी काहीही करेल. तर एका अन्य युझरने लिहिले की एक आई अशीही असते. आय लव्ह यू आई. आतापर्यंत मोठ्या संख्येने हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. तसेच कमेंटही केल्या जात आहेत.