scorecardresearch

Video: मंदिर परिसरात तरुणीच्या अंगावर चढली माकडं, तरुणीच्या झिंज्या उपटल्या अन्…

माकडांसोबत खेळ करणाऱ्या तरुणीच्या माकडांच्या टोळीने डोक्यावर चढून झिंज्या उपटल्या, पाहा व्हिडीओ.

Video: मंदिर परिसरात तरुणीच्या अंगावर चढली माकडं, तरुणीच्या झिंज्या उपटल्या अन्…
माकडांनी तरुणीवर हल्ला केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. (Image- Instagram)

Monkey Viral Video : माकडांसोबत खेळ करणं काही जणांना आवडतं. पण माकडांसोबतचा खेळ कधी अंगटल येईल, हे सांगता येणार नाही. काही माणसं प्राण्यांना त्यांचे मित्र समजतात. पण माकडासारखे प्राणी मस्ती करताना जेव्हा मर्यादा ओलांडतात, त्यावेळी मोठी फजिती झाल्याशिवाय राहत नाही. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल तुफान व्हायरल झाला आहे. एका माकडांची टोळी तरुणीच्या मागेच लागल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मंदिर परिसरात माकडांचा मुक्त संचार असल्याचं आपण नेहमीच पाहतो. माकड खाण्याची एखादी वस्तू दिसल्यावर लोकांना नाहक त्रास देत असल्याचं अनेकदा व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे. आताही अशाच प्रकारची घटना समोर आली असून माकडांसमोर मस्ती करणाऱ्या तरुणीला चांगलीच अद्दल घडली आहे.

तीन माकड तरुणीच्या थेट डोक्यावर चढले अन् घडलं भयंकर, पाहा व्हिडीओ

एक तरुणी मंदिर परिसरात उभी असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. त्याचवेळी ती माकडांच्या जवळ गेल्यावर तीन-चार माकडांनी चक्क त्या तरुणीच्या डोक्यावरच उडी घेतल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. माकडांच्या टोळीने हल्ला केल्यावर तरुणी स्वत:ची सुटका करण्यासाठी प्रयत्न करते. पण तीन माकड तिच्या डोक्यावर चढून केस धरताना व्हिडीओत दिसत आहेत. तरुणीच्या पाठीवर गेल्यानंतर माकडांनी या तरुणीचे पाय पकडले. मस्ती करणाऱ्या माकडांना या तरुणीला आवरता आलं नाही. पण माकडांपासून सुटका करण्यासाठी तरुणी धडपड करत असल्याचं व्हिडीओत तुम्ही पाहू शकता.

नक्की वाचा – Video: बर्फाळ प्रदेशात गरुडाला भरली हुडहुडी, पंखांना लावलेल्या कॅमेरात बर्फाचा आख्खा डोंगरच झाला कैद

इथे पाहा व्हिडीओ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या व्हिडीओला चार हजारहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तसंच व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही करताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत माकडाची खिल्ली उडवली आहे. “बंदर भय्या” असं त्या नेटकऱ्याने म्हटलं आहे. माकडांसोबत मस्ती करताना अनेकदा लोकांची फजिती झाल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. या तरुणीच्या बाबतीतही असाच भन्नाट प्रकार घडला असून मजेशीर व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 16:09 IST

संबंधित बातम्या