सुंदर दिसण्याच्या हव्यासापोटी लोक काय करतात? सौंदर्यप्रसाधने वापरणे ते शस्त्रक्रियेपर्यंत अनेक गोष्टी करतात. पण ही घटना थोडी वेगळी आहे. या मुलीला एलियन (Alien)बनायचं आहे. हे थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. एलियनसारखा लूक मिळवण्यासाठी, विनी ओहने (Vinny Ohh) तिच्या शरीरावर सर्व प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी करत संपूर्ण स्वरूप बदलले. एकेकाळी अतिशय सुंदर दिसणाऱ्या विनी पाहून आता लोक घाबरत असतील.

दुसऱ्या ग्रहासारखे दिसायचे आहे

विनी ओहला दुसऱ्या ग्रहातील रहिवाशांमध्ये खूप रस होता. त्यामुळे ती स्वतःला त्याच्यासारखं बनवण्याचा प्रयत्न करू लागली. आता तिची ही आवड सोशल मीडियाच्या जगात चर्चेत आहे. विनी ओहला ‘रिअल लाइफ एलियन’ बनण्याचे इतके वेड आहे की ती आता पूर्णपणे वेगळी दिसते.

(हे ही वाचा: उडणाऱ्या हरणाला कधी बघितलं आहे का? राष्ट्रीय उद्यानातील Video Viral )

लाखो रुपये केले खर्च

अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय विनीने असा लूक मिळवण्यासाठी १०० हून अधिक सर्जरी केल्या आहेत. या शस्त्रक्रियांवर त्यांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे त्यांचा संपूर्ण चेहराच बदलून गेला आहे. शरीराच्या सततच्या उपचारांमुळे आता विनी ओहला ओळखणेही कठीण झाले आहे. डेली स्टार या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वयाच्या १७ व्या वर्षी विनीवर पहिल्यांदा शस्त्रक्रिया झाली होती. मग त्याच्या ओठांवर फिलर लावून त्याचा संपूर्ण आकार बदलला. त्यानंतर विनीने मागे वळून पाहिलेच नाही.

(हे ही वाचा:सिंहाने पाणी पीत असलेल्या हरणावर केला हल्ला आणि…;बघा व्हायरल व्हिडीओ)

(हे ही वाचा: Photos: उद्योगपती मुकेश अंबानींसह भारतातील फक्त ‘या’ ४ लोकांकडे आहे Tesla)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मिडीयावर असते सक्रीय

विनी ओह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोअर्सहीची संख्याही जास्त आहे. तिला ५५,९०० लोक इन्स्टावर फॉलो करतात. या नाट्यमय परिवर्तनाची काहींनी प्रशंसा केली. तर कोणी या परिवर्तनाला मूर्ख म्हटले.