दररोज लाखो लोक विमानातून प्रवास करतात. विमानात प्रवाशांसाठी अनेक सोयी उपलबध असतात. पण, कधी कधी काही तांत्रिक कारणांमुळे विमान उड्डाणाला उशीर होत असतो. तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. विमानात प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे आणि विमानाने दोन तास उशिरा उड्डाण केलं आहे. पण, याचे कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
व्हायरल व्हिडीओ विमानातील आहे. एअर होस्टेस पूर्ण विमानात स्प्रे (Spray) मारताना दिसत आहेत. प्रकरण असे आहे की, विमानात अचानक डास शिरले आणि गोंधळ सुरू झाला आणि त्यांना मारण्यासाठी विमानातील एअर होस्टेस आणि एक व्यक्ती फवारणी करते आहे. तर प्रवासी त्यांच्या परीने मच्छरला दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसून आले आहेत. विमानात डास शिरले या घटनेमुळे विमानाच्या उड्डाणाला तब्बल दोन तास उशीर झाला आहे. ही घटना पाहून अनेकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. डास शिरल्याने कशाप्रकारे विमानात तारांबळ उडाली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा…
व्हिडीओ नक्की बघा :
विमानात शिरले डास :
मेक्सिकोमध्ये हा अजब प्रकार घडला आहे. एअर होस्टेस संपूर्ण विमानात डास घालवण्यासाठी स्प्रे मारताना दिसत आहेत. विमानात बसलेले प्रवासी तिकीट किंवा कागदाच्या मदतीने डासांपासून संरक्षण करत आहेत. विमानात स्प्रे मारल्यामुळे अनेक प्रवाशांना खोकला येऊ लागला. ही घटना एका मेक्सिको फ्लाईटमध्ये घडली, जेव्हा विमान टेक ऑफ करणार होते. मात्र, उड्डाण करण्यापूर्वीच डासांचा थवा विमानात शिरला. या घटनेनंतर डासांमुळे विमान टेक ऑफ करण्यास दोन तासांचा उशीर झाला. तसेच जोपर्यंत विमानातील लाईट बंद होत नाही, हे डास असेच विमानात फिरत असल्याचं प्रवाशांचे म्हणणे आहे; असे व्हिडीओमध्ये इंग्रजी अक्षरात लिहिण्यात आले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @withywizard_1 या एक्स ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. डास चावले की शरीराला खाज येते, सूज येते या सगळ्या गोष्टी लक्षात घेता प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून विमानातील सहकारी पूर्ण विमानात स्प्रे मारताना दिसून आले आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांना ही घटना भयानक वाटते आहे, तसेच काही जण हे पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.