Viral video: आई वडील मुलांना मोठं करण्यासाठी अनेक काबाडकष्ट करत असल्याचे आपण अनेकदा पाहिलं असेल. काही वेळा मुलं मोठी झाल्यावर याची परतफेड करताना कसे वागतात हेही आपण पाहिलं असेल..तरीही आई आपल्या मुलांवर किती प्रेम करते हे सांगायची गरज नाही. तुमच्या प्रत्येक छोट्या गरजांची काळजी घेण्यापासून ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यापर्यंत, ती नेहमीच तुमच्याबद्दल विचार करत असते. मुलही आईच्या पदराआड सुखात असतात, पण हीच मुलं मोठी झाली की आपआपल्या मार्गानं निघून जातात. मात्र आई ही तिथेच असते. अशाच माय-लेकाच्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोरोनामुळे परदेशात स्वित्झर्लंडमध्ये अडकलेला एक मुलगा त्याच्या आईला भारतातील केरळात पाच वर्षांनी भेटायला आला.

५ वर्षांनी माय-लेकाची भेट

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आईला कमजोर आणि आणखी म्हातारी झाल्याचे पाहून तो नाराज झाला. मग त्याने म्हाताऱ्या आईला खांद्यावर घेऊन त्याने तिला फिरायला नेले. त्यामुळे म्हाताऱ्या आईच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. मुलाच्या आणि आईच्या अनोख्या नात्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर खूपच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ‘या’ आगळ्यावेगळ्या प्रयोगातून मुलांचे मोबाईलचे व्यसन सुटणार, जाणून घ्या शिक्षण विभागाचे नियोजन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरीही व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत.