Shocking Video: बाळ जन्माला येण्याआधी नऊ महिने आई त्याची खूप काळजी घेते. जन्मानंतरही शारीरिक, मानसिक त्रास सहन करून आई अगदी काळजाच्या तुकड्यासारखं त्या मुलाला जपते, त्याची काळजी घेते. आईसारखी काळजी जगात कोणीच घेऊ शकत नाही आणि आईसारखी माया कोणालाच लावता येत नाही, असं म्हटलं जातं.
आपल्या मुलांना आपल्या जीवापेक्षा जास्त जपणाऱ्या आईनं जर स्वत:च्याच लेकराला मारहाण केली तर… सध्या असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडलाय; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक आई आपल्याच मुलाच्या जीवावरच उठलीय.
आईने केला मुलीचा छळ (Mother Beats Girl Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तुमचाही राग अनावर होईल. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येतंय की, एक आई निर्घृणपणे आपल्या पोटच्या लेकीला मारहाण करत आहे. हातात पलिता घेऊन, ती तिच्या चिमुकलीला जबर मारहाण करताना दिसतेय. या मारहाणीत मुलगी तिच्या आईला मारू नको, अशी विणवणी करताना दिसतेय; पण लेकीला अगदी जमिनीवर लोळवत आई मारहाण करत आहे. दरम्यान, व्हिडीओच्या कॅप्शननुसार हा व्हिडीओ मुंबईतील दिवा येथील असल्याचं बोललं जातंय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @primezewsmarathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला तब्बल १६.४ मिलियन व्ह्युज आले आहेत. तसेच ‘माता न तूं वैरिणी! आईकडून पोटच्या मुलीला अमानुष मारहाण…, मोठ्या मुलीनं मोबाईलमध्ये चित्रित केला व्हिडीओ…, दिव्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस..’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया (Mother Viral Video)
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “ज्यांना मूलबाळ नाही त्यांना विचारा अपत्याचं महत्त्व…, देव अशांना मुलं देतो ज्यांना त्यांची कदर नाही”, तर दुसऱ्यानं, “हिला अक्कल आहे का थोडीफार”, अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “आईच्या नावाला कलंक आहे ही कृती” तर, एकानं “काय बाई आहे ही हिला थोडी तरी अक्कल आहे का”, अशी कमेंट केली.