सोशल मीडियावर रोज वेगवेळ्याप्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ काही शिकवून जातात तर काही विचार करायला भाग पाडतात. काही व्हिडीओ भावूक करतात तर, काही व्हिडीओ आपल्याला हसवतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात एक सुनेच्या डोक्याला ओवाळणी केल्यानंतर नारळ लागतो.

हा व्हिडीओ काल पासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेक मीम पेजवर हा व्हिडीओ टाकला जातोय. सोशल मीडियावर व्हायरल झालेला या व्हिडीओमध्ये एक सासू आपल्या नववधूच स्वगत करत असावी. ती नववधूपुढे नारळ ओवाळते आणि फेकते. हा फेकलेला नारळ त्या नववधूच्याच डोक्यावर बसतो. त्याच क्षणी सासू आपल्या सुनेजवळ जाऊन तिला किती लागलं आहे हे बघते.

(हे ही वाचा: ट्रॅफिक पोलिसांसोबतच रस्त्याच्या मधोमध पठ्ठ्याने केला डान्स; Video सोशल मीडियावर व्हायरल)

बघा व्हायरल व्हिडीओ

(हे ही वाचा: Vishal Kusum Love Story: कुसुमचा मेसेज विशालला मिळाला, १० रुपयांची नोट पुन्हा viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

अवघ्या सात सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. वेगवेगळ्या सोशल मीडियावर हा शेअर केला जात आहे. यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया नेटीझन्स देत आहेत.