Viral video: लग्नापुर्वी अन् लग्नातही नवरीला सर्वात जास्त कोणाची भीती वाटत असेल तर ती म्हणजे सासू. आपली सासू कशी असेल याची धाकधुक प्रत्येक नवरीला असते. पण समजा हीच सासू अगदी आईसारखी असली तर…सध्या एका सासूचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय.सासू-सूनेच्या नात्याबद्दल आपण आजवर अनेक किस्से ऐकले आहेत. कधी छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भाडंण तर कधी मायेचा ओलावा देणारे सासू-.सूनेचे हे नाते. सोशल मीडियावर आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत,त्यामध्ये या नात्याबद्दलचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत. यात सासूचा असा व्हिडीओ समोर आला आहे की पाहून प्रत्येक मुलगी म्हणेल मलाही अशीच सासू हवी गं बाई.

सध्या लग्नाचा सीझन असून अनेक लग्न पार पडताना दिसत आहे. गेल्या एक महिन्यापासून अनेक लग्न पार पडली असून यामधील काहींचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लग्नातील निरनिराळे व्हिडीओ कायमच पहायला मिळतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. सासू-सून यांच्यातील नातेसंबंधांवर अनेक टीव्ही शोज आहेत, ज्यामध्ये त्यांच्यातील तू-तू-मैं-मैं बघायला मिळते. अनेक सासू आणि सूनेच्या नादात मज्जा कमी आणि वाद जास्त असतात. हे अनेक घरांमध्ये पाहायला मिळते. अनेक सून सांगतात की सासू आपल्याला आपल्या मुलीसारखी का वागवत नाही. तर सून आपल्याशी आईसारखी वागणूक का देत नाही, अशी सासूची तक्रार असते. मात्र, काही घरांमध्ये सासू-सुनेचे नाते खूपच मस्त असते, याचे ताजे उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हयरल झालेला एक व्हिडीओ.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नाच्या दिवशी सुन तयार झाल्यानंतर तिला पहिल्यांदा बघितल्यानंतर सासूबाईंनी अशी रिअॅक्शन दिली आहे की सर्वच सासू सुनेच्या नात्याचं कौतुक करत आहेत. सासूबाई आपल्या होणाऱ्या सुनेला पाहून खूप खुश दिसत आहेत, आणि तिचं कौतुकही करत आहेत. शेवटी त्यांनी सुनेची गालावर पापीही घेतली.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Hemangi Patil (@hemangipatil_makeupartist)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर @hemangipatil_makeupartist या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “अशी सासू मिळायला नशीब लागतं”