पोटच्या लेकरानं कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम करू नये, त्याने समाजात मान सन्मान मिळवावा, अशी प्रत्येक आईची इच्छा असते. जन्माला आल्यापासून आपल्या मुलाचं पालनपोषण करण्यात आईचा सिंहाचा वाटा असतो. मुलगा चुकला तर काही पालक त्याची समजून घालून माफ करतात. पण अत्यंत कडक स्वभावाचे काही पालक मुलांना भयंरक शिक्षा द्यायलाही मागे पुढे बघत नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे. तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नेमकं काय घडलं?

तेलंगणात एका महिलेनं तिच्या मुलाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकल्याची घटना व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली आहे. १५ वर्षीय मुलाला धुम्रपानाचं व्यसन असल्यानं त्याच्या आईने भयंकर शिक्षा दिल्याचं उघडकीस आलं आहे. मुलाला धुम्रपान करण्याची सवय असल्याचं माहित झाल्यावर महिलेनं तिच्या मुलाल एका खांबाला बांधलं आणि त्याच्या डोळ्यात मिरची पावडर चोळली. आईने पोटच्या मुलाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकण्याची कडक शिक्षा दिल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मिरची डोळ्यात गेल्यावर अतिशय वेदना झाल्यानंतर तो मुलगा जोर जोरात ओरडत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – जुळ्यांचा नादच खुळा! दोन बहिणींनी एकाच तरुणासोबत थाटला संसार, नवऱ्याच्या अंगलट येणार?

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. महिलेनं धुम्रपान करणाऱ्या मुलाल दिलेल्या शिक्षेचं काहींनी समर्थन केलं आहे. तर काही जणांनी महिलेच्य या कृत्याला विरोध दर्शवला आहे. एका युजरने कमेंट करत म्हटलं, काही वेगळ्या माणसांसाठी मानसिक प्रभावातून दिलेल्या शिक्षेचं हे उदाहरण आहे. अशा पद्धतीने शिक्षा दिल्यानंतरही या पिढीतील मुलं बदलतील, असं वाटत नाही. तर दुसऱ्या युजरने म्हटलं, कोरोना काळात सर्व मुलं घरी होती, महामारीत त्यांना घराबाहेर पडता आला नाही. कोरोना काळात अनेकांना गांजाचंही व्यसन लागल्याचं मी पाहिलं आहे.