Duck Stealing Bread for Duckling :”स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी!”,ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल याचा अर्थ असा हे की, जगातील सर्वात श्रींमत व्यक्तीकडे जर आई नसेल तर त्याची अवस्था भिकाऱ्यासारखीच आहे. कारण आईची जागा या जगात कोणतीही वस्तू घेऊ शकत नाही. जितकं प्रेम आई आपल्या मुलांवर करते तितके प्रेम कोणीही करू शकत नाही मग ते पशु पक्षी का असेना. मातृत्व हे फक्त मानवापूरते मर्यादीत नाही तर ही भावना प्राण्यामध्येही तितकीच रुजलेली आहे. प्राणी देखील आपल्या पिल्लांवर तेवढाच जीव लावतात जेवढा एक आई आपल्या लेकरांवर करते. आई आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते याचीच प्रचिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंके आहे.

सोशल मीडियावर पशु पक्ष्यांची आणि अनेक व्हिडीओ व्हिडीओ व्हिडीओवर असतात, व्हिडीओज लोकांना आवडतात. असाच एक भावुक करणारा व्हिडीओ हिडिओ समोर येत आहे. एक बदक आपल्या पिल्लांसाठी एका बेकरी दुकानात शिरते आणि मालकासमोरच चोचेमधये ब्रेड पकडून पळन जाते. चोर बदकाला पकडण्यासाठी दुकान मालक त्याचा पाठलाग करतो पण जेव्हा तो तिच्या पिल्लांना पाहतो त्यानंतर तो ही भावूक होतो.

खरं तर, व्हायरल व्हिडिओमध्ये दुकानाबाहेर बदकांची भुकेली पिल्ले दिसत आहेत. पिलांची आई एका बेकरी दुकानात शिरून त्यांच्यासाठी ब्रेड घेऊन येते आणि तिच्या पिल्लांना आणि ती तिच्या मुलांना खायला देते. भुकेली पिल्लांना अन्न खाताना पाहून ती खुश होते. जेव्हा दुकानाचा मालक पहिल्यांदा बदकाला ब्रेड चोरून घेऊन जाताना पाहतो तेव्हा त्याला खूप राग येतो. तो बदकाला अडवण्याचा प्रयत्न करतो. आरडा ओरडा करतो. बदकाला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावतो पण जेव्हा धावत धावत बदक दुकानाबाहेर असलेल्या पिल्लांजवळ पोहचते तेव्हा दुकान मालक स्तब्ध होतो. पिल्लांसाठी बदकाने अन्न चोरले हे पाहून त्याला वाईट वाटते आणि तो बदकाला चोरी करण्यासाठी माफ करतो. हा व्हिडिओ खूप आवडला आहे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी खूप सुंदर कमेंट्स केल्या आहेत.