Burning Bike VIDEO: उन्हाळा आला की कारला, बाईकला आग लागण्याच्या घटनांच्या बातम्या कानावर पडू लागतात. काही ठिकाणी अपघातामुळे कारला आग लागते, तर काही वेळा अचानक धावत्या कारला, बाईकला आग लागते. गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांशी संबंधित अशी अनेक प्रकरणेही समोर आली आहेत, आता असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये चालत्या बाईकला आग लागल्याचे दिसून येत आहे. या घटनेत बाईक पूर्णपणे जळून खाक झाली असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

कधी पुढे काय होईल, याचा काहीचं थांगपत्ता लागत नाही. आपल्या आजूबाजूलाही अशा अनेक घटना या घडत असतात त्यामुळे आपण अजूनच सतर्क होतो. परंतु सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.  व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती साधारणपणे रस्त्यावरून बाईक चालवत आहे. मात्र, थोडं पुढे गेल्यावर बाईकला अचानक आग लागते. आग लागताच काही वेळातच दुचाकी चालवणाऱ्या तरुणाच्या पाठीवर असणारी बॅगला ही आग लागते आणि त्यानंतर आग लागताच ती व्यक्ती आपल्या बाईकचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करते आणि तात्काळ बाईकवरुन खाली उडी घेते.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
uddhav thackeray narendra modi (1)
“…तर मी मोदींसाठी धावून जाईन”, पंतप्रधानांच्या हाकेला उद्धव ठाकरेंची साद? म्हणाले, “त्यांच्यासाठी…”
Bhavesh Bhinde arrested
मोठी बातमी! घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक; उदयपूरमधून पोलिसांनी घेतले ताब्यात
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
Asaduddin Owaisi Constituency Voting Misconduct Agent Pushes EVM Button Claims Viral Video
ओवेसींच्या मतदारसंघात मतदाराला बाजूला करून EVM चं बटण दाबायला भलताच एजंट? Video ची दुसरी बाजू पाहिलीत का?
Prajwal Revanna in Trouble
‘सेक्स व्हिडिओचा तो पेनड्राईव्ह मीच दिला’, रेवण्णाच्या ड्रायव्हरचा धक्कादायक दावा; म्हणाला, “त्यांनी माझ्या बायकोला…”

(हे ही वाचा : VIDEO: रेल्वे प्रवाशांनी खचाखच भरली, छतावर चढू लागले प्रवासी; नंतर पोलिसांनी केलं असं काही की तुम्हीही कराल कौतुक!)

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, त्या व्यक्तीच्या दुचाकीला आग लागली आणि त्यानंतर त्याची बॅगही आगीत जळाली आणि बॅगेत ठेवलेला फोन आणि इतर वस्तूही रस्त्यावर पडल्याचे दिसते. यावेळी त्या व्यक्तीच्या मदतीसाठी कोणीही पुढे येताना दिसले नाही. सुदैवाने त्या व्यक्तीला काहीही झाले नाही, मात्र त्याची दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येते.

हा व्हिडीओ X वर @crazyclipsonly नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ४८ लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला, तर १३ हजारांहून अधिक लोकांनी त्याला पसंती दिली. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट्सही करत आहेत. एकाने कमेंट केली की, “मी पहिल्यांदाच असा व्हिडीओ पाहिला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने चालत्या बाईकला आग लागल्यावर उडी मारून आपला जीव वाचवला.” दुसऱ्याने कमेंट केली की, बाईकचा वेग खरोखरच खूप जास्त होता.”

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही युजर्स आगीमागचे कारणही सांगत आहेत. “इंधन लिक झाल्यामुळे बाईकला आग लागली आहे”, असे काही युजर्सचे म्हणणे आहे, तर काहींच्या मते, “हा व्हिडीओ खरा नसून एडिट केलेला आहे.” हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्स बाईकमध्ये करण्यात आलेले स्टायलिश मॉडिफिकेशन हे आगीचे कारण मानत आहेत.