बरेलीच्या एसडीएम ज्योती मौर्यचे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून, नोकरी मिळाल्यानंतर अनेक महिला नवऱ्याला सोडून गेल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यूपी, बिहारनंतर आता मध्य प्रदेशातूनही अशीच एक घटना समोर आली आहे, जिथे पतीने पत्नीच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले, पण नोकरी मिळताच पत्नी नवऱ्याला ओळखण्यासही नकार देत आहे.

बायकोला शिकवलं, नर्स बनताच नवऱ्याला फसवलं –

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशातील अनूपपुर जिल्ह्यातील आहे, येथील जोहन भारिया नावाचा एक व्यक्ती आपली तक्रार घेऊन कलेक्टरकडे गेला. यावेळी त्याने सांगितले की, त्याची पत्नी त्याच्याकडे राहत नाही, तर त्याच्या पत्नीचे नाव मीनाक्षी असं आहे. तो म्हणाला “लग्नानंतर मी तिच्या शिक्षणासाठी लाखांहून अधिक रुपये खर्च केले, मात्र आता तिला नोकरी मिळाल्यानंतर तिने ती मला ओळखण्यासही नकार देत आहे.”

हेही वाचा- डेहराडूनमध्ये पावसाचे थैमान, डिफेन्स कॉलेजची इमारत काही क्षणात नदीत कोसळली, घटनेचा थरारक Video व्हायरल

मीनाक्षीचे आधीच झाले होते लग्न –

जोहनच्या सांगितलं, मीनाक्षीचे आधी एक लग्न झाले होते पण ती तिच्या सासरी न राहता माहेरी राहत होती. याच काळात माझी तिच्याशी भेट झाली आणि घरच्यांच्या दबावामुळे मी कुणालाही न सांगता तिच्याशी लग्न केले. त्यानंतर ती माझ्याबरोबर राहू लागली, आम्हाला एक मुलगी झाली आहे. लग्नानंतर ती परीक्षेची तयारी करत होती, तिचे कष्ट पाहून मीदेखील तिला मदत करायचं ठरवलं. कर्ज घेऊन मी मीनाक्षीला जीएनएमचे प्रशिक्षण दिले. जेव्हा जास्त पैशांची गरज होती तेव्हा मी विमा पॉलिसी मोडली पण तिचा अभ्यास थांबू दिला नाही. मीनाक्षीची निवड झाली आणि तिची खांडवा जिल्हा रुग्णालयात नियुक्ती झाली. मात्र, तेव्हापासून ती बदलली असून आता मिनाक्षी आपल्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आल्याचं सांगत तुम्ही दुसरी पत्नी पाहा असं सांगत असल्याचही जोहन म्हणाला.

हेही पाहा- Gadar 2: ‘गदर 2’ पाहण्यासाठी थिअटरमध्ये चक्क ट्रॅक्टरवर पोहोचले फॅन्स, आनंद महिंद्रा म्हणतात; आता तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तो पुढे म्हणाला, मी माझ्या मुलीबरोबर गुजरातला गेलो होतो, यावेळी ती तिच्या भावाबरोबर आली आणि मला धमकावून मुलीला घेऊन गेली. दरम्यान, आता जोहन मीनाक्षीला घरी परत आणण्यासाठी कलेक्टरकची मदत घेत आहे. यावेळी त्याने माझी पत्नी आता मला ओळखण्यासही नकार देत असल्याची तक्रार केली आहे.