पती आणि मुलांच्या चुकीच्या वागण्यामुळे नाराज झालेल्या एका महिला शिक्षिकेन आपली करोडो रुपयांची संपत्ती हनुमान मंदिराला दान केल्याची घटना ससोर आली आहे. मात्र, शिक्षिकेच्या या निर्ययामुळे नवरा आणि मुलं दु:खी झाले आहेत. घरात कोट्यवधी रुपयांची संपत्ती असूनही आपल्या मनाला शांती, समाधान मिळत नसेल तर अनेकवेळा लोकं आपल्या घराचा त्याग करतात, अशा अनेक घटना पाहिल्या आहेत. मात्र, आपल्या पती आणि मुलांची वागणूक चांगली नाही म्हणून एका महिलेने चक्क करोडों रुपयांची संपत्ती मंदिरासाठी दान केल्याची घटना मध्य प्रदेशातील श्योपूर येथे घडली आहे.

हेही वाचा- पोट की पैशांचा खजिना? रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी काढली तब्बल १८७ नाणी

संपत्ती दान करणाऱ्या महिलेचं नाव शिव कुमारी जदौन असं असून त्या विजयपूर येथील खितरपाल गावातील सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. शिव कुमारी यांनी सांगितलं की, “मी माझी सर्व मालमत्ता छिमछिमा हनुमान मंदिर ट्रस्टच्या नावावर स्वतःच्या इच्छेने केली आहे.” तर या शिक्षिकेने घर, प्लॉट, पगार आणि विमा पॉलिसीसह सर्व पैसे मंदिराला दिले आहेत.

शिक्षेकेने दान केलेले घर, पैसे आणि दागिन्यांच्या एकूण किंमत एक कोटींहून जास्त आहे. दरम्यान, ही संपत्ती दान केली असली तरी महिला शिक्षिका सध्या तिच्या घरातच राहणार असून मृत्यूनंतर हे घरही मंदिर ट्रस्टचे होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षिका आपल्या मुलांच्या आणि पतीच्या चुकीच्या वागण्यामुळे सतत नाराज असायची. तर त्यांच्या वागण्यात काही सुधारणा होत नसल्याने तिने आपल्या मुलांना त्यांचा संपत्तीचा वाटा दिला आणि उरलेली सर्व संपत्ती मंदिर ट्रस्‍टच्‍या नावावर केली.

हेही पाहा- Viral Video: हजारो लोकांसमोर लाइव्ह सूरु असताना कोरियन महिलेची मुंबईत छेडछाड, बळजबरीने जवळ ओढलं अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलेने मृत्युपत्रात लिहिलं आहे की, माझ्या मृत्यूनंतर माझी सर्व मालमत्ता मंदिर ट्रस्टची होईल, मृत्यूनंतर केवळ मंदिर ट्रस्टच्या लोकांनीच माझे अंतिम संस्कार करावेत. दरम्यान, शिव कुमारी या लहानपणापासूनच देवाची पूजा करायच्या त्यांना लहानपणापासूनच देवाची भक्ती करण्याची आवड होती. शिवाय मुलांच्या आणि पतीच्या वागण्यावर नाराज असलेल्या शिव कुमारी यांनी संसाराला कंटाळून आपली सर्व संपत्ती मंदिरासाठी दान करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आहे.