लहान मुलांनी खेळताना अजाणतेपणी पैशांची नाणी गिळल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील, ऐकल्या असतील. मात्र, ५८ वर्षांच्या एखाद्या व्यक्तीने पैशांची नाणी गिळल्याचं तुम्हाला सांगितलं तर कदाचित त्यावर तुमचा विश्वास बसणारं नाही. पण सध्या अशी एक घटना उघडकीस आली आहे. ती ऐकून तुम्हालादेखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

कर्नाटकमधील एका ५८ वर्षाच्या व्यक्तीने एक, दोन आणि पाच रुपयांची तब्बल १.५ किलोग्रॅम वजनाची, १८७ नाणी गिळाली होती आणि ती डॉक्टरांनी ऑपरेशन करुन बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील लिंगसुगुर येथील असून दयामप्पा हरिजन असं नाणी गिळालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

हेही पाहा- Video: हवेतून उडणारं विमान थेट विजेच्या तारांमध्ये घुसलं, ९० हजार घरात…

मिळालेल्या माहितीनुसार, दयामप्पा हरिजन यांच्या पोटात दुखायला लागल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात नेले. तेथून त्यांना बागलकोट येथील श्री कुमारेश्वर रुग्णालयात पाठवण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी एक्स-रे आणि एंडोस्कोपीद्वारे तपासणी केली असता त्यांना रुग्णाच्या पोटात अनेक पैशांची नाणी आढळून आली. दयामप्पा यांच्या पोटात इतकी नाणी पाहून डॉक्टरांना देखील आश्चर्याचा धक्का बसला.

हेही पाहा- अजबच! आई-वडीलांनी मुलाला चक्क रात्रभर टीव्हीसमोर बसवलं अन्…; कारण जाणून तुम्हीही व्हाल हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दयामप्पा यांनी गिळलेली नाणी जर त्यांच्या आतड्यात गेली असती तर त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असती. शिवाय ही नाणी त्यांनी अनेक महिन्यांपुर्वी गिळली असावी असं देखील डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे दयामप्पा यांच्या पोटातील सर्व नाणी काढली असून आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ईश्वर कलबुर्गी, प्रकाश कट्टीमणी, रूपा हुलाकुंडे आणि ए. अर्चना या डॉक्टरांच्या पथकाने दयामप्पा यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.