अनेक लोक संपूर्ण कुटुंबासह बाहेरगावी जायला घाबरतात, कारण सोशल मीडियावर आणि टीव्हीवर दररोज येणाऱ्या चोरीच्या बातम्या पाहून अनेकांना घरात कोणी नसताना आपल्याही घरात चोरी होणार नाही ना? याची भीती सतावत असते. शिवाय जरी काही कारणानिमित्त सर्वांना बाहेर जाण्याची वेळ आलीच तर लोक घराच्या सुरक्षेसाठी विविध उपाय शोधतात. यासाठी कधी ते घरात सीसीटीव्ही लावतात, तर कधी सुरक्षारक्षकांची नेमणूक करतात, तरीही काही चोरटे घरातील मौल्यवान वस्तू पळवून नेतात. त्यामुळे लोकं घरातील वस्तू अशा ठिकाणी लपवून ठेवतात जिथे कोणीही जाऊ शकत नाही. सध्या मध्य प्रदेशातून अशीच एक घटना समोर आली आहे. येथील एक कुटुंब भोपाळला जाणार होते म्हणून त्यांनी चक्क डस्टबिनमध्ये मौल्यवान दागिने लपवून ठेवले होते, पण जेव्हा ते कुटुंबीय घरी परतले तेव्हा डस्टबिनमधील कचरा आणि दागिने गायब झाले होते.

जावयाच्या चुकीमुळे दागिने गेले कचऱ्यात –

Virat Kohli's reaction on strike rate
विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन टीका करणाऱ्यांना फटकारले; म्हणाला, ‘जे लोक दुसऱ्यावर टीका करतात त्यांनी स्वत:…’
Mahavitaran Employee, Fatally Attacked, High Electricity Bill, Inquiry, murder in pune, murder in baramati, Mahavitaran Employee attacked, Mahavitaran Employee murder, barmati news, marathi news, pune news, mahavitaran news, police,
बारामती : महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याचा कोयत्याने १६ वार करून खून, विजेचे बिल जास्त आल्याने ग्राहकाकडून हल्ला
parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रीवा येथील रहिवासी प्रमोद कुमार यांनी त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तू डस्टबिनमधील कचऱ्यात लपवून ठेवल्या होत्या. मात्र त्यांनी लपवलेले दागिने कचरा गोळा करणाऱ्या लोकांनी थेट डंपिंग ग्राउंडवर नेऊन टाकले. शिवाय या घटनेची माहिती जेव्हा प्रमोद कुमार यांना समजली तेव्हा त्यांना धक्काच बसला आणि ते कचर्‍यात फेकून दिलेल्या मौल्यवान वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्या वस्तू मिळाल्या नाहीत. तर घरातील हे दागिने कचरा गोळा करणारे लोक कसे घेऊन गेले आणि या वस्तू परत कशा मिळाल्या? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

हेही पाहा- “आयुष्यात पैसा…” श्रीमंत होण्यासाठी कशावर फोकस करावा? हर्ष गोयंकांनी शेअर केला मजेदार किस्सा, वाचून नेटकरी म्हणतायत…

सुदैवाने परत मिळाले दागिने –

प्रमोद कुमार यांना संपूर्ण कुटुंबासह भोपाळला जायचे असल्यामुळे त्यांनी घरातील मौल्यवान वस्तूंची चोरी होऊ नये म्हणून त्यांनी त्या वस्तू घरातील डस्टबिनमध्ये लपवून ठेवल्या. पण प्रमोद कुमार भोपाळला गेले आणि त्याच दरम्यान त्यांचा जावई रीवा येथील घरी आला. यावेळी जावयाला घरातील डस्टबिन कचऱ्याने भरलेला दिसला, म्हणून त्याने कचरा गोळा करणाऱ्या लोकांकडे तो डस्टबिन दिला. कारण त्यामध्ये दागिने असल्याची कल्पना नव्हती. दरम्यान, जेव्हा प्रमोद कुमार हे घरी आले असता त्यांना घरातील कचरा गायब झाल्याचं समजलं. शिवाय संपूर्ण घटनेची माहिती समजल्यानंतर त्यांनी तत्काळ कचरा गोळा करणाऱ्या कंपनीशी संपर्क करुन त्यांना सर्व प्रकरणाची माहिती दिली. यानंतर जवळपास २४ लोकांनी मिळून कचऱ्याच्या ढीगाऱ्यात दागिने शोधायला सुरुवात केली. त्यानंतर डंपिंग ग्राऊंडमधील कचऱ्यात खूप शोध घेतल्यानंतर १२ लाखांचे दागिने सापडले अन् प्रमोद कुमार यांच्या जीवात जीव आला.