scorecardresearch

Premium

VIDEO: लग्नाळू पोरांना एमएस धोनीचा विचित्र सल्ला, म्हणाला, “मेरी वाली अलग है…”

एम एस धोनीने लग्नाळू पोरांना ‘कूल’ सल्ला दिला आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ms dhoni advice bachelor friends viral video
भारताचा माजी क्रिकेट कर्णधार (फोटो- screengrab/Youtube)

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटच्या मैदानावर एक ‘मास्टर टॅक्टीशियन’ म्हणून ओळखला जातो. क्रिकेट खेळताना कितीही कठीण परिस्थिती असली तरी एमएस धोनी सर्व काही सहजतेने हाताळतो. पण त्याचं ज्ञान केवळ क्रिकेटपुरते मर्यादित नाही. त्याने अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान, लग्नाळू पोरांना आगळावेगळा सल्ला दिला आहे. या मुलाखतीची छोटीशी व्हिडीओ क्लिप सोशल सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

ज्यामध्ये एमएस धोनी एका कार्यक्रमाला उपस्थित असून प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसत आहे. ज्यामध्ये उपस्थित सर्व लग्नाळू पोरांना एक आगळावेगळा सल्ला दिला आहे. सल्ला देताना धोनी म्हणाला, तुम्हाला कुणी भेटलं असेल आणि तुम्ही खरंच आनंदी असाल, तर प्लिज लग्न करा. इथे जे मुलं बॅचलर आहेत किंवा त्यांना प्रेयसी आहे, अशा मुलांचे काही गैरसमज असतात, ते मी दूर करू इच्छितो. माझी प्रेयसी सगळ्यात वेगळी आहे, असा विचार अजिबात करू नका. (ये मत सोचना की मेरी वाली अलग है)

man parades with-wife severed head
धक्कादायक! एका हातात पत्नीचं कापलेलं मुंडकं आणि दुसऱ्या हातात विळा घेऊन फिरत होता माणूस, पोलिसांनी केली अटक
Delhi Airpot
“तिच्या बॅगेत सेक्स टॉय, अशा महिलांना…, दिल्ली विमानतळावरील ‘त्या’ घटनेतील मूक साक्षीदाराला नक्की कसली खंत?
grandma and grandchild couple dance video
आजी नातूचं प्रेम! नऊवारीत आजीने केला नातवाबरोबर कपल डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
an old man kombda dance funny video viral
कोंबडा डान्स व्हायरल! आजोबांनी केलेल्या अतरंगी डान्सची सगळीकडे चर्चा, व्हिडीओ एकदा पाहाच…

धोनीच्या या सल्ल्यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावर नेटकऱ्यांकडून मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. रिजि (RIGI) या युट्युब चॅनेलने महेंद्र सिंगची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर अवघ्या काही तासांत या व्हिडीओला ८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ms dhoni advice to bachelor friends yeh mat sochna ki meri wali alag hai viral video rmm

First published on: 29-10-2023 at 16:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×