धोनीची चिमुकली झिवा या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असते. तीही धोनीइतकीच सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही. या चिमुकलीचा बोबड्या बोलीत भक्तीगीत गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.
बापरे! राजाच्या अंत्यसंस्कारासाठी चक्क ५८५ कोटी केले खर्च
Video : अन् स्टार फिश चालू लागला, दुर्मिळ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
भक्तीगीत गाणाऱ्या निरागस झीवाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. झिवा जे गाणं गात आहे ते मल्याळम भाषेतील श्रीकृष्णाचं भक्तीगीत आहे, त्यामुळे अनेकांनी मल्याळम भाषेमधील तिचं गाणं ऐकून कौतुकही केलं आहे. हा व्हिडिओ साक्षी किंवा धोनीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला नसून तो खुद्द झिवाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच झिवाच्या नावानं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करण्यात आलं होतं.