जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबांनी यांनी शुक्रवारी १६ सप्टेंबरला तिरुमाला मंदिराला भेट दिली. त्यांनी भगवान वेंकटेश्वरचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचे चिरंजीव अनंत अंबानी आणि त्याची होणारी पत्नीही सोबत होते. गेल्या महिन्यात रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा देऊन त्यांनी हा व्यवसाय आपल्या मुलांच्या हातात सोपवला आहे. यानंतर ते देवाचे दर्शन घेण्यासाठी आंध्रप्रदेशात पोहोचले.

ऑगस्ट महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीच्या वार्षिक बैठकीमध्ये त्यांनी भारतात ५जी सेवा आणण्याची घोषणा केली होती. पुढील महिन्यापासून रिलायन्स भारतात ५जी सेवा सुरु करणार आहे. यानंतर ही कंपनी देशात ५जी सेवा पुरवणारी पहिली कंपनी ठरेल.

Namibian Cheetahs : नामशेष झालेल्या चित्त्याचे तब्बल ७० वर्षांनंतर भारतात पुन्हा आगमन; पाहा नवा Video

मिळालेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी आंध्रप्रदेशातील सुप्रसिद्ध तिरुमाला मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि भगवान वेंकटेश्वरचा आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांच्याबरोबर अनंत अंबानींची होणारी पत्नी राधिका मर्चंटही होती. राधिका ही प्रसिद्ध उद्योगपती एनकोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी हे बालपणीचे मित्र असून दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

नक्की पाहा – अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा साखरपुडा! राजेशाही थाटातील सोहळ्यामधील पहिला फोटो आला समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुकेश अंबानी यांनी मंदिरात जाऊन पूजा केल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानाला डिमांड ड्राफ्टच्या रूपात देणगी दिली. त्यांनी देवस्थानाला तब्बल दीड कोटींची देणगी दिली आहे. मात्र अंबानी कुटुंबाकडून अशाप्रकारची देणगी देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी उत्तराखंडच्या चारधाम बोर्डाला पाच कोटी रुपयांची देणगी दिली होती. ही देणगी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने दिली.