Mumbai rains: राज्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये जोरात पाऊस कोसळत आहे. आज पहाटेपासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. अजून पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतले काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मुंबईकरांनो तुम्हीही घराबाहेक पडताना हे व्हिडीओ पाहा. मुंबईकरांना सध्या घरीच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबईत आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने मुंबईत पुढील तीन ते चार तासांमध्ये अत्यंत तीव्र सरी बसरण्याचा अंदाज वर्तवला आहे. सकाळी नऊ वाजले तरी मुंबईत रात्रीसारखा अंधार पसरला आहे. आकाशात काळ्या ढगांची गर्दी आणि वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु असल्याने रस्त्यावर काही अंतरावरचे दिसणेही अवघड झाले आहे. यावेळी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर गाड्यांची गर्दी पाहायला मिळाली आहे. तसेच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने ठाण्यातील कळवेकर रेल्वे प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. कळवा परिसरातील रेल्वे कारशेट वरून सुटणाऱ्या रेल्वे ट्रेन पकडण्याकरिता नागरिकांची कारखेड ट्रॅकवर मोठी गर्दी आहे.अनेक कळवेकर रेल्वे प्रवासी जीव धोक्यात टाकून भर पावसात रेल्वे ट्रॅक वरून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
पाहा व्हिडीओ
वेस्टर्न एक्सप्रेस हायवे
अंधेरी सबवे बंद
मुंबईत लोकल सेवेचा खोळंबा, रेल्वे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात
काल सर्वाधिक पाऊस पडला. दुपारनंतर मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली असं वाटत असताना पुन्हा धो-धो पाऊस सुरु झाला. कालदेखील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. आजदेखील अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानंतर आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.