अनेकदा प्रवाशांचे रिक्षावाल्यांबाबतचे अनुभव वाईट असतात. कधी हवं त्या ठिकाणी येण्यास नकार, कधी चुकीच्या रस्त्याने नेऊन अधिकचं भाडं घेणं आणि कधी मीटरप्रमाणे येण्यास नकार देणाऱ्या रिक्षाचालकांच्या वाईट अनुभवांची यादी भरपूर मोठी असते. मात्र, असं सार्वजनिक चित्र असताना मुंबईतील एका रिक्षाचालकाने त्याच्या विशेष पुढाकाराने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. त्याच्या रिक्षातील सोयीसुविधांची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा आहे.

सोशल मीडियावर मुंबईतील एका रिक्षाचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. यावर वापरकर्तेही कौतुकाचा वर्षावर करत आहेत. या फोटोत चालकाने आपल्या रिक्षात प्रवाशांसाठी तयार केलेल्या सोयीसुविधा दिसत आहेत. यानुसार चालकाने प्रवाशांना रिक्षात मोफत पिण्याच्या पाणी बॉटल, बिस्किट आणि वर्तमानपत्र ठेवलेले दिसत आहेत.

हा फोटो शेअर करणाऱ्याने ट्विटरवर कॅप्शन दिलं, “ही सूचना महत्त्वाची आहे. मुंबईत रिक्षावाला मोफत पाणी देत आहे. हे पाहणं फारच संतुष्ट करणारं आहे.” यावेळी त्यांनी ‘स्प्रेड काईंडनेस’ हा हॅशटॅगही वापरला.

हेही वाचा : ५० रुपये देतो रडून दाखव… चिमुकलीने Video मध्ये तीन सेकंदात केली जादू; उभ्या उभ्या सगळ्यांना केलं थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या फोटोला हजारो लोक लाईक करत आहेत. तसेच अनेकजण या फोटोवर आपल्या भावना व्यक्त करत आहेत. कोणी म्हटलं अगदी छोटा प्रवासही तुमच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो, तर कुणी म्हटलं दयाळू होण्यासाठी चालकाचे धन्यवाद. एकीकडे अनेक रिक्षाचालकांचे अनुभव वाईट येत असताना मुंबईतील या रिक्षाचालकाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत.