Ghatkopar Stampede-Like Situation video: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात.मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या लोकांमुळे ही गर्दी वाढत आहे. या मुंबई लोकलची गर्दी हीच तिची खरी ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र ही गर्दी कधी कधी जीवावरही बेतू शकते. ठाणे स्थानकावरील दुर्दैवी घटनेनंतर सार्वजनिक वाहतुकीत गर्दी वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे, ज्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आणि काहींना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान आज सकाळीच ७ जुलै रोजी घाटकोपर रेल्वे स्थानक आणि मेट्रो स्थानकावर प्रचंड गर्दी आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती झाली. या घटनेचे बरेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, स्टेशनवर प्रचंड गर्दी दिसत आहे. मुंगीलाही जागा नसलेल्या या गर्दीत अक्षरश: लोकांचा दीव गुदमरत आहे. यावेळी प्रवासी जीव धोक्यात घालून या गर्दीत उभे आहेत. काही प्रवासी एस्केलेटर वापरुन मेट्रोमध्ये जाण्याचा मार्ग शोधत आहेत. मोठा जमाव परिसरात गर्दी करत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी थोडीशी जरी या गर्दीत वाढ झाली असती तर प्राणघातक घटना घडू शकली असती. एक जरी प्रवासी खाली पडला असता तर अनेकांचे यामध्ये जीव गेले असते.

घाटकोपरमधील आणखी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये घाटकोपर स्टेशनवर पुरुष धावत्या ट्रेनमधून जबरदस्तीने ढकलत आणि उडी मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ रेडिटवर शेअर करण्यात आला होता.
मुंबईच्या घाटकोपर स्टेशनवरील व्हायरल व्हिडिओमध्ये लोकल ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. ही गोंधळलेली परिस्थिती प्रवाशांसाठी सामान्य” बनत असून याबद्दल प्रश्न उपस्थित होतात. व्हिडिओमध्ये प्रवाशांची एवढी भयंकर गर्दी दिसून येतेय की व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी बसेल.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर लोक संतापले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, काहींनी अधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी केली आहे तर काहींनी व्यक्तींच्या बेजबाबदारपणाबद्दल टीका केली आहे. तसेच प्रवाशांनी अनेक स्थानकांवर अशीच परिस्थिती असून गर्दीची तक्रार करत लवकरात लवकर याचे व्यवस्थापन करण्याची मागणी केली आहे. एकानं म्हंटलंय, “अरे हे रोजचं झालं आहे, हे पाहून असं वाटतं की, मुंबईकरांनी जगायचं की नाही?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घाटकोपर स्थानकावरून येणाऱ्या व्हिडिओंमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल आणि सार्वजनिक वाहतुकीतील, विशेषतः मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी सरकार काय करत आहे याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. लोकल ट्रेनमधील गर्दी आणि कोंडी ही एक चिंताजनक बाब बनली आहे. त्यामुळे या समस्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.