Local Train Fight Video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून धक्का बसतो. अशातच बऱ्याचदा मुंबई लोकलचे व्हिडीओही आपल्याला पाहायला मिळतात. प्रवासादरम्यान अनेक वेळा सीटवरून प्रवाशांमध्ये वाद होत असतात. लांबचा प्रवास करणार्‍या प्रवाशाला पुढच्या प्रवासासाठी बसायला जागा मिळत नाही आणि त्यासाठी मग तो वाटेल ते करू लागतो, तेव्हा भांडण होण्याची शक्यता असते. सीटवरून प्रवाशांमध्ये होत असलेला वाद अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतो, ज्याचे व्हिडीओ सर्रासपणे व्हायरल होतात, आणि नेटकरी देखील असे व्हिडीओ खूप एन्जॉय करतात.आतापर्यंत तुम्ही मुंबई लोकलमधील महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. लोकलमधली महिलांची भांडण काही नवी नाही, त्यातल्या त्यात पुरुषांच्या भांडणाचे व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. असाच एक भाईंदर लोकलमधील पुरुषांमधील राड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आतापर्यंत लोकलमध्ये तुम्ही सीटसाठी हाणामारी पाहिली असेल पण सध्या मुंबई लोकलमध्ये झालेल्या भांडणाचं कारण ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू भाईंदर लोकलमध्ये पाय ठेवायलाही जागा नाही एवढी गर्दी आहे. यावेळी पुरुष चक्क मोकळ्या हवेसाठी हाणामारी करत आहेत. होय, खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये जिथे पाय ठेवायला जागा नाही, तिथे यांना मोकळी हवा हवी आहे. आणि या हवेसाठी प्रवासी राडा करत आहेत. गर्दीमध्ये रंगलेला हा कुस्तीचा डाव पाहून खरंच तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

शाब्दिक सुरू झालेली ही लढत काही वेळानंतर धक्काबुक्कीपर्यंत पोहोचते. मुंबई लोकलमध्ये मारहाणीच्या घटना सातत्यानं घडत असल्याचं समोर येतं. रोज कुठेना कुठेना अगदी क्षुल्लक कारणांवरुन बाचाबाची, मारहाण असे प्रकार घडत असतात. 

पाहा व्हिडीओ

लोकलचे हे प्रश्न कधी सुटणार

लोकलसेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. या लोकलमधून लाखो नागरिक हे रोज प्रवास करत असतात. मात्र, लांबचा प्रवास करताना जागा मिळवण्यासाठी वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे नेहमीच होत असलेल्या अशा प्रसंगांवरून मुंबई लोकलचे हे प्रश्न कधी सुटतील हा प्रश्न पडतो.