Mumbai Local Train Video : मुंबई ही स्वप्नांची नगरी. इथे प्रत्येक जण धावताना पळताना दिसतो. मुंबईच्या लोकांचे आयुष्य हे अत्यंत वेगवान आहे यात लोकल ट्रेन ही तर मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. दररोज हजारो लोकं लोकलनी प्रवास करतात. सर्वसामान्यांसाठी लोकल म्हणजे जीव की प्राण आहे. एक दिवस जरी ही लोकल ट्रेन बंद असली तरी मुंबईकरांचे वेळापत्रक चुकते.

लोकलमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच प्रवास करतात. त्यामुळे अनेकदा लोकल ट्रेनमध्ये भयानक गर्दी दिसून येते. गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी महिलांचे खास वेगळे डब्बे आहे. पण महिलांच्या डब्ब्यात सुद्धा भयानक गर्दी दिसते. सोशल मीडियावर लोकलचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लोकलच्या महिला डब्यात महिलांचाच राडा पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Video : डान्सिंग भेळ खाल्ली का? भेळ विक्रेत्याचा मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

हा व्हायरल व्हिडीओ एका स्टेशनवरील आहे. या स्टेशनवर लोकल ट्रेन थांबली आहे. लोकल ट्रेनमध्ये भयंकर गर्दी दिसत आहे. काही महिला चढताना दिसत आहे तर काही महिला उतरताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की महिलांच्या डब्यात महिलाच राडा करताना दिसत आहे. महिला चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून कोणीही संताप व्यक्त करेन. या व्हिडीओवर या स्टेशनचे नाव लिहिलेय. हा व्हिडीओ ठाणे स्टेशनवरील आहे.

View this post on Instagram

A post shared by Chal Mumbai ? (@chal_mumbai)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

chal_mumbai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ठाणे स्टेशन….” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आयुष्य एकदाच मिळतं त्यामुळे मानसिक आरोग्याला कशाला त्रास देता?” तर एका युजरने लिहिलेय, “मंत्री संत्री लोकांना दाखवा कोणीतरी हा व्हिडीओ” आणखी एका युजरने लिहिलेय, “गड्या आमची पुनवडीच बरी” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.