Viral video: आत्महत्या हा अनेक दशके आपल्या समाजात दुर्लक्षलेला विषय राहिला आहे. सुशांत सिंग राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा व्यक्तींच्या आत्महत्येनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्या विषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे.कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या भयानक घडतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, काय लिहावं किंवा काय सांगावं ते सूचत नाही. अशाच एका व्यक्तीने मिरा रोड स्टेशनजवळ रेल्वे रुळावर आपलं डोकं ठेवलं अन् तेवढ्यात ट्रेन आली…यानंतर पुढे काय घडलं ते तुम्हीच पाहा.या घटनेचा थराकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आजची तरुण पिढी काही अडचणी आल्या की ते थेट आत्महत्येचं पाऊल उचलतात. मग विष पिऊन आत्महत्या करणे, गळफास लावून घेणे, रेल्वेखाली उडी मारणे अशा घटना आपण पाहिल्या आहेत. त्यात अजून एका घटनेची भर पडली आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आत्महत्या करत असल्याचे दिसते. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकल ट्रेनचा मोटरमन मीरारोड स्थानकात पोहोचत असताना त्याला रुळावर काहीतरी हलचाल जाणवली. थोडक्यात निरीक्षण करताच, त्याला एक व्यक्ती रुळावर आडवी झोपलेली दिसली. क्षणाचाही विलंब न करता मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक दाबून ट्रेन काही फूटांवर थांबवली.रेल्वे थांबवल्यानंतर तो व्यक्ती स्वत:हा उठून बाजूला होतो आणि पुन्हा रेल्वे थांबताच ती व्यक्ती डब्याखाली जाऊन बसतो. यानंतर तिथूनही त्याला बाहेर काढता येतं आणि मग ट्रेन पुढे जाते.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये घटनेची माहिती दिली आहे. “मीरा रोड स्थानकाजवळ फास्ट ट्रॅकवर आत्महत्येच्या प्रयत्नात रुळांवर झोपलेल्या व्यक्तीला पश्चिम रेल्वेच्या मोटरमन अरविंद कुरिल यांनी वेळेत पाहून लोकल काही अंतरावर थांबवली. रेल्वे थांबताच ती व्यक्ती डब्याखाली जाऊन बसली. यानंतर तात्काळ हस्तक्षेप करत त्याला वाचवले. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे एक जीव वाचल्याने पश्चिम रेल्वे त्यांच्या सन्मान करण्याच्या तयारीत आहे.” तसेच लोकंही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “याला चांगलीच शिक्षा करा”