Father daughter Viral video: ‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी’ बाप-लेकीचं नातं वेगळं सांगायची गरज नाही. जगातील कुठल्याचं नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी ओढ बाप-लेकीत असते. बाबा हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. तो एकाच नात्यात हजारो नाती लेकीसाठी निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत, बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो. याचंच उदाहरण म्हणून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

सध्या राज्यभरात पोलिस भरतीचं सत्र सुरू आहे. मुंबईतही पोलिस भरतीच्या परीक्षा, मैदानी चाचणी सुरू आहेत. यावेळी संपूर्ण राज्यभरातून तरुण, तरुणी या भरतीसाठी येत असतात. अशीच एक तरुणी पोलिस भरतीची परीक्षा देण्यासाठी आली होती, मात्र परीक्षा देऊन बाहेर आली अन ढसाढसा रडायला लागली. या तरुणीला शारीरिक चाचणीमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे ती बाद झाली. यावेळी तरुणीला अश्रू अनावर झालेले असताना तिचे वडील तिचे डोळे पुसताना दिसले. बाप-लेकीच्या नात्यातील हे प्रेम पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगी पोलिस भरतीच्या शारीरिक चाचणीत कमी मार्क मिळाल्यामुळे रडत आहे. यावेळी तिचे वडील त्यांच्या गळ्यातील गमछाने तिचे अश्रू पुसत तिला समजावत आहेत. वर्षानुवर्ष तयारी केल्यानंतरही जेव्हा अपयश मिळतं तेव्हा हे अपयश पचवायला वेळ लागतो. शेवटी एका वडिलांच्या नजरेत जेव्हा मुलगी जिंकते ना, तेव्हा ती जग जिंकलेली असते. शेवटी बापाएवढं लेकीचं कौतुक कुणालाच नसतं, हे हा व्हिडीओ पाहून सिद्ध होतंय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जय जवान पथकाचा १० थरांचा थरारक प्रयत्न; एक चूक अन् मनोरा कोसळला, VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकं काय चुकलं?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर swaraj_academy_dahiwadi_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत; तर नेटकरीही व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. नेटकरी वडिलांच्या या कृतीचे कौतुक करीत आहेत. “ही मुलगी खूप भाग्यवान आहे, कारण तिला तुमच्यासारखे वडील मिळाले”, अशी प्रतिक्रिया एकानं दिली आहे; तर दुसऱ्या एक युजरनं “असा बाबा सर्वांना हवा”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. वडील आणि मुलीचं नातं खूपच खास असतं. मुलं आईच्या खूप जवळची असतात, तर मुली वडिलांच्या खूप जवळच्या असतात, असं म्हटलं जातं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या, पोलिस भरती देणाऱ्या किंवा अन्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, अपयश म्हणजे अंत नाही. त्यामुळे प्रयत्न करत राहा, एक दिवस नक्की यश मिळेल.