गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगरात मुसळधार पावसाने मुक्काम ठोकला आहे. मुंबई, तसेच उपनगरांत बुधवारी पहाटेपासूनच पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. वसई विरारलादेखील पावसाचा तडाखा बसलाय. अनेक भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचलंय. दरम्यान नालासोपारा येथील रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा व्हिीडीओ सध्या सोशल मडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई, ठाणे आणि उपनगरात आजपासून सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. वसई-विरारमध्येही अधूनमधून कोसळत असलेल्या पावसाच्या सरींमुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. नालासोपाऱ्यातील रस्ते एक ते दीड फूट पाण्याखाली गेले. त्यामुळे नागरिकांची तसेच वाहनचालकांची चांगलीच गरसोय झाली. याच पाण्यातून पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना वाट काढावी लागली.

नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस

दरवर्षीच पावसाळ्यात हा रस्ता पाण्याखाली जातो व रस्त्याशेजारी असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरते. दरवर्षी पावसाळ्यात लाखो रुपयांचे नुकसान इथल्या दुकानदरांना सहन करावे लागते. मात्र तरीही महापालिका त्यावर काही उपाययोजना करत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

पाहा व्हिडीओ

हेही – पुढील २४ तासांत राज्यातील अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता…

बळीराजा सुखावला

या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. पावसाच्या भरंवशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र हवा तास पाऊस न झाल्याने चिंतेचे वातावरण होते. मात्र आता दमदार सरी बरसल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुसळधार पाऊस कोसळताना अथवा भरतीच्या वेळी उंच लाटा उसळताना समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, असे आवाहन यंत्रणांकडून करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ९८.४ मिलीमीटर, तर सांताक्रूझ केंद्रात ५२.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.