Mumbai viral video: मुंबईला सध्या मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. जागोजागी पाणी साचलं होतं, लोकल ट्रेन ठप्प झाल्या होत्या आणि रस्त्यांवर होड्या चालवता येतील इतकं पाणी भरलं होतं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही तासांत आणखी जोरदार पाऊस पडणार आहे, ज्यामुळे मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.गेले तीन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडला. आता पाऊस थांबला असला तरीही काही ठिकाणी अजून पावसाचं पाणी ओसरलेलं नाहीये. अशातच खरा धोका सुरु होतो. पावसामुळे रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात चालताना थोडं सावध राहणं आवश्यक आहे. कारण या पाण्यात सापही असू शकतात. होय, मुंबईतील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या ठिकाणी चक्क साचलेल्या पाण्यात एक भलामोठा अजगर सापडला.

मुसळधार पावसामुळे प्राण्यांच्या बीळांमध्येही पाणी साचलं आहे. परिणामी, बेडूक, साप, सरडे, उंदीर असे विविध प्रकारचे जीव बीळ सोडून बाहेर मोकळ्या जागेत येत आहेत. याच पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये तुम्ही एका अजगराला रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून बाहेर आल्याचं पाहू शकता. हा अजगर पाण्यातून बाहेर येत सोसायटीच्या गेटच्या बाजूला एका कट्ट्यावर थांबलेला दिसत आहे. आता विचार करा की या पाण्यात आपण चालतोय आणि चुकून अजगरावर पाय पडला तर काय होईल…नक्कीच साप चावणार. या अजगराला पाहून लोकही घाबरले आहेत.

दरम्यान, ही संपूर्ण घटना आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.हा व्हिडीओ सावधतेचा इशारा मानूनच पाहा. कारण साचलेल्या पाण्यातून चालताना कधी काय पायाखाली येईल, सांगता येत नाही. त्यामुळे काळजी घ्या.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ khabronkakhulasa नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. सर्पदंश टाळण्यासाठी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. सर्पदंश झाल्यावर वेळेवर उपचार न मिळणे, दवाखाण्यात जाण्यासाठी वाहन न मिळणे, दवाखाना लांब असणे, दवाखान्यात सर्पदंशावरील लस उपलब्ध नसणे, अशा कारणांनी नागरिकांना सर्पदंशानंतर आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळं पावसाळ्याच्या काळात शेतकरी आणि विशेत: ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.