Railway accident Viral video: रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढताना ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो भारतीय रेल्वे नेहमी सर्व प्रवाशांना सल्ला देते की कधीही चालत्या ट्रेनमध्ये चढू नये, अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. मात्र तरीही प्रवाशी या नियमांकडे दुर्लक्ष करून चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत आणि आपला जीव धोक्यात घालतात.कधी कधी ते मोठ्या अपघाताला बळी पडतात आणि मृत्यूही पत्करतात. सध्या अशीच एक घाटकोपर रेल्वे स्थानकावरील घटना समोर आलीय. ज्यामध्ये एका एक व्यक्ती अक्षरश: प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील अंतरात अडकली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना जुनी आहे मात्र त्याचा व्हिडीओ ओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण जवळपास प्रत्येकाने वाचले आहे. कारण- घाई करताना अपघात होण्यापेक्षा संथ गतीने सुखरूप घरी पोहोचलेले बरे, हा या वाक्यामागचा मुख्य उद्देश आहे. तरीदेखील काही मंडळी या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात अन् पुढे त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागते. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घाटकोपर रेल्वे स्टेशनवर एका व्यक्तीचा भीषण अपघात झाला असून, तो रेल्वेच्या चाकामध्ये अडकला आहे. यावेळी ट्रेन थांबवण्यात आली असून, इतर प्रवासी आणि पोलीस त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. एवढा भयंकर अपघात पाहून तुम्हीही यापुढे रूळ ओलांडण्याआधी आणि चालत्या गाडीत चढण्याआधी १०० वेळा विचार कराल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी उशीर झालाय आणि तुम्ही जर वेळेत पोहोचण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट घेत असाल, तर स्वत:ला आवरा आणि थांबा. कारण- काळ कुणाला सांगून येत नसतो. तो कधीही आपल्या वाटेत येऊन आपला जीव घेऊ शकतो आणि आपल्याला हे सुंदर जीवन जगण्याचा आनंद गमवावा लागू शकतो.
पाहा व्हिडीओ
bandhunews नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर भरपूर लाईक्स आणि कमेंट येत आहेत. यापूर्वीही स्टेशनवर अशा अनेक घटना घडल्या आहेत, तरीही लोक यातून धडा घेत नाही.