Mumbai Video : अनेक लोक देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जातात, पण देव हा सर्वत्र असतो असे म्हणतात. सध्या मुंबईच्या सीएसटी येथे शिवशंकराबरोबर एकटीच बोलत असलेल्या एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही महिला पायातील चप्पल काढून शिवशंकराबरोबर बोलत आहे. आजीची ही भक्ती पाहून अनेक लोक भारावून गेले आहेत.
सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यात शिवशंकराची आराधना केली जाते. शिवशंकराच्या दर्शनासाठी हजारो लोक मंदिरात गर्दी करतात, पण या वृद्ध महिलेने चक्क मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर शिवशंकराचे दर्शन घेतले आहे. भोळ्या शंकराची ही भोळी भक्त सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

हेही वाचा : “ए माझ्या नवऱ्याला सोडा”; नवरदेवाचे कान पिळताच नवरीने केली मध्यस्थी… VIDEO होतोय तुफान व्हायरल

हा व्हायरल व्हिडीओ मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातील आहे. या व्हिडीओत अनेक लोक ये-जा करताना दिसत आहेत, पण व्हिडीओतील एका वृद्ध महिलेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ही वृद्ध महिला तेथील एका खांबावर काढलेल्या शिवशंकराच्या चित्राला हात लावत त्याच्याबरोबर एकटीच बोलत आहे. विशेष म्हणजे ही महिला पायातील चप्पल काढून शिवशंकराचे दर्शन घेताना व्हिडीओत दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by TSB – The StoryBlog (@thestoryblog)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्राम’thestoryblog’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “साधेपणा, पवित्रता, विश्वास, आशा आणि प्रार्थना.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, “हे शिवशंकरा, या आजीच्या सर्व इच्छा पूर्ण कर”; तर एका युजरने लिहिले, “दर्शन करताना त्यांनी पायातील चप्पल काढली आहे, हीच आपली संस्कृती आहे.” आणखी एका युजरने लिहिले, “महादेवा, या आज्जीचं काय दुःख असेल ते लवकरात लवकर दूर कर.”