Viral Video : सोशल मीडियावर अनेक चांगल्या वाईट घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही लोक त्यांना आलेले अनुभव सांगतात. या व्हिडीओंवर नेटकरी त्यांचे मत मांडतात. कधी कौतुक करतात तर कधी टीका करतात. मुंबईतील सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण बेस्ट ड्रायव्हरशी वाद घालताना दिसत आहे. नेमकं काय प्रकरण आहे, कोणाची काय चूक आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
हा व्हायरल व्हिडीओ मुंबईतल्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे मागठाणे बसस्टॉप जवळचा आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक बस भररस्त्यात उभी आहे आणि या बसच्या एका बाजूला स्कुटी पडलेली दिसत आहे. तरुण या बसचा व्हिडीओ शूट करत म्हणत आहे, “मी अशीच गाडी ठेवणार… मी अशीच गाडी ठेवणार. भाई भररस्त्यात ओव्हरटेक करतो हा बंदा मला दाबलं पूर्ण.. त्याने मुद्दाम गाडी चढवली आहे माझ्यावरती, हे बघ गाडी चढवली अंगावरती. मी अशीच गाडी ठेवणार बाबा. मलाच ठोकतोय. हा गाडी ठोकतोय त्याला कळायला पाहिजे. तो मगाशी जीव घेण्याच्या मागावरती होता आता डायरेक्ट उडवतोय. म्हणजे काय मूर्ख आहे का मी? (काही लोक म्हणाले, जाऊ द्या) अरे का जाऊ द्या. दुसऱ्यांदा मारायचा प्रयत्न केला, दुसऱ्यांदा. दोन दोन वेळा मारायचा प्रयत्न करतोय तो..तितक्यात एक महिला तिथे त्याच्याबाजूने बोलायला येते”
बेस्ट बसचा चालक निमुटपणे हे सर्व बघत असतो. तो एक शब्दही बोलत नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल होतोय व्हिडीओ (Viral Video)
या तरुणाचे नाव विजय बेंदूरे असून bendure_vijay या त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलेय, “हा व्हिडीओ वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे मागठाणे बसस्टॉप जवळचा आहे जिकडे ह्या बस ड्रायव्हरने मला आणि एक महिला होती जी स्कुटरवरून जात होती, त्याने आम्हा दोघांना दोन वेळ उडवण्याचा प्रयत्न केला. माझ्या पुढे जी महिला होती तिच्या पायाला लागलं होतं म्हणून ती पूर्ण पणे घाबरली होती आणि माझी स्कुटर तुम्ही बघू शकता पूर्ण पणे फिरली आहे, म्हणजे किती जोरात ठोकली असेल पण जो बस ड्रायव्हर आहे त्याचे उत्तर एवढेच होते, “तुमच्यासाठी मी माझी गाडी का थांबवू” आणि त्याला त्या बस स्टॉप जवळ थांबायचं होते आता हे असं झालं आहे अशा या माजुरडे ड्रायव्हर, लोकांनी यांची बस फक्त स्टॉप वरती थांबवायची आणि सर्व सामान्य माणसाच्या वरून गाडी चालवून घेऊन जायची. मुंबई पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस, ह्या ड्रायव्हरवर अॅक्शन घेऊ शकत असेल तर घ्या.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आपला मराठी माणूस जागा झाला” तर एका युजरने लिहिलेय, “हा तर एक ट्रेलर होता, खूप काही सहन करतो आपण” आणखी एका युजरने लिहिलेय, “ड्रायव्हर साहेबांचा अॅटिट्यूड बघा” अनेक युजर्सनी बेस्ट ड्रायव्हरची चूक असल्याची सांगितले तर काही युजर्सनी या तरुणाची चूक असल्याचे लिहिलेय.