Mumbai Viral Video : सोशल मीडियावर मुंबईतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ भावुक करणारे असतात तर काही व्हिडीओ संतापजनक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक भयानक घटना दिसून येईल. एका वृद्ध महिलेच्या अंगावर बॅरिकेड कोसळलेलं दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही संताप येईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

अंधेरीत लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेच्या अंगावर कोसळले

मुंबईमध्ये रस्त्यांवर सध्या क्राँक्रिटीकरणाची कामं जोरदार सुरू आहे. अनेक भागांमध्ये वाहनचालकांची गैरसोय होऊ नये प्रशासन काळजी घेत आहे आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी कामांच्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड लावले आहेत जेणेकरून अपघात टाळता येईल पण कुणीही विचारही केला नसेल की हेच बॅरिकेड एखाद्यासाठी जीवघेणे ठरू शकते.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला रस्त्याने जात असते. या दरम्यान सोसाट्याचा वारा सुटलेला असतो आणि रस्त्यावर लावलेले लोखंडी बॅरिकेड अचानक तिच्या अंगावर कोसळतं. पुढे तुम्हाला व्हिडीओत दिसेल की बॅरिकेड अंगावर पडल्याने ही महिला पडते. सुदैवाने लोक लवकर धावून येतात आणि बॅरिकेड बाजूला करतात व महिलेचा जीव वाचवतात.
हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. ही घटना अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात घडली आहे. या घटनेने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली असून लोक मनपासह स्थानिक प्रशासनावर नागरिकांच्या सुरक्षिततेवरून प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

SaferRoadsSquad या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, “बॅरिकेड्स नीट फिक्स केले नाही” तर एका युजरने लिहिलेय, “फुटपाथ असताना रस्त्यावरून का चालता?” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा मुर्खपणा आहे” अनेक युजर्सनी बीएमसीवर टीका केली आहे. काही युजर्सनी महिलेची चूक असल्याचे लिहिलेय तर काही युजर्सनी प्रशासनाची चूक असल्याचे लिहिलेय.