Mumbai Rain Viral Video: गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाने जिकडे तिकडे पाणी साचले असून अनेक मोठमोठ्या इमारतींमध्ये पाणी शिरले आहे. या पावसामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होताना दिसत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. मुंबईत, ठाणे, कल्याण परिसरात मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मोठमोठे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे पाण्यातून मार्ग काढून प्रवास करावा लागत आहे.

अशा स्थितीत आजवर आपण अनेकदा म्हणायचो की एक वेळ येणार जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर गाड्यांऐवजी बोटी चालवाव्या लागतील. अन् काय सांगता ती वेळ खरोखरच आली आहे. विरारमधील लोक चक्क बोटीत बसून प्रवास करताना दिसतायेत. विश्वास बसत नाहिये ना? तर मग हा व्हिडीओ पाहा, रस्त्यांवर गाड्यांऐवजी चक्क बोटी फिरतायेत. विरारकर या बोटीतून घरी, ऑफिसला जात आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – हक्काचं छप्पर उद्धस्त! “इर्शाळवाडीत आता काळा चहा, गरे कोण खाऊ घालेल” ट्रेकरचे PHOTO पाहून व्हाल भावूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. काही नेटकऱ्यांनी अखेर तो दिवस आलाच! असे म्हणत प्रशासनाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर काही जणांनी अखेर अडचणींवर मार्ग शोधलाच असे म्हणत मुंबईकरांच्या या पर्यायी मार्गाचेही जोरदार कौतुक केले आहे.