अंकिता देशकर

Hindu Muslim Social Experiment: लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे लक्षात आले की, ज्यात हिंदूबहुल भागात मुस्लिमांनी पांढरी जाळीची टोपी (स्कलकॅप) घालण्यास कोणताही आक्षेप घेतला जात नाही, पण मुस्लिम बहुल भागात भगवा स्कार्फ घालण्यावर आक्षेप घेतला जातो. असा द्वेष पसरवणारा दावा केलेला होता. या व्हिडिओमध्ये संबंधित मुद्द्यांवरून हिंदू- मुस्लिम तरुणांमध्ये भांडण होत असल्याचे सुद्धा दिसत आहे.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर @maheshyagyasain ने व्हायरल व्हिडिओ शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडिओचे काही स्क्रीनशॉट घेऊन आणि वापरलेल्या वॉटरमार्कचे निरीक्षण करून आमची तपासणी सुरू केली. व्हिडिओच्या एका फ्रेमवरील वॉटरमार्कमध्ये ‘PM2VLOGS’ असे लिहिले आहे. आम्हाला YouTube वर ‘PM 2 Vlogs’ हे चॅनल सापडले.

आम्हाला या चॅनेलवर मूळ व्हिडिओ सापडला.

या व्हिडिओचे शीर्षक होते: ?हिंदू भाई को मुस्लिम भाई ने भगाया फिर | Social Experiment | Hindu Muslim | Hindu| Muslim| Media

जवळपास तीन लाख स्बस्क्राइबर्स असलेल्या या व्हिडिओला ५२ हजारापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये भांडताना दिसणारे लोक व्हिडिओच्या सुरुवातीला एकमेकांची ओळख करून देताना दिसतात. त्या व्यक्तीचे म्हणणे आहे की ते मुस्लिमबहुल भागात भांडण करणार आहेत आणि त्यांना त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहायच्या आहेत. हा एक सामाजिक प्रयोग होता.

हे ही वाचा<< भारतात ‘मुस्लिम एक्सप्रेस’ धावणार? ट्रेनचे दृश्य पाहून नेटकरी संतप्त; म्हणाले, “गार्डचं पण ऐकत नाहीत, स्टेशनवरच…”

या दीर्घ आवृत्तीमध्ये व्हायरल व्हिडिओ सारख्या फ्रेम्स ५ मिनिटांनंतर पाहता येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: एका सामाजिक प्रयोगातील स्क्रिप्टेड व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो हिंदू आणि मुस्लिम समाजातील लोकांमधील भांडणाचा खरा असल्याचा दावा करतो. पण मुळात दावा खोटा आहे.