Viral Video : सोशल मीडियावर शाळेतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. शाळेतील व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकदा शाळेच्या आठवणी समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली विद्यार्थीनी भर वर्गात शिक्षकांसमोर रडताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. शाळेच्या आठवणी नेहमी ताज्या करतात. शाळेतील शिक्षक असो किंवा मित्र मैत्रीणी मनाच्या कोपऱ्यात कायम आठवणीत असतात. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना त्याच्या बालपणीच्या किंवा शाळेतल्या मित्र मैत्रीणींची आठवण येईल.
हा व्हायरल व्हिडीओ शाळेतील एका वर्गातील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक चिमुकली विद्यार्थीनी हातात माइक घेऊन बोलताना दिसत आहे. तिच्या शेजारी दोन शिक्षिका दिसत आहे. विद्यार्थीनीच्या पुढे भरपूर विद्यार्थी बाकावर बसलेले दिसत आहे. व्हिडीओ पाहून सुरुवातीला तुम्हाला वाटेल की ही विद्यार्थीनी भाषण देत आहे. पण ती जे काही बोलते ते पाहून तुमच्याही डोळ्यांमध्ये पाणी येईल. विद्यार्थीनी हातात माईक घेऊन सांगते, “माझी नियती नावाची मैत्रीण माझी बेस्ट फ्रेंड होती आणि माझ्या एका चुकीमुळे ती माझ्याशी आता बोलत नाही. मला खूप तिच्याशी बोलावसं वाटतं. मी तिला खूप वेळेस सॉरी म्हणते. ती माझ्याशी बोलली पाहिजे, इतकीच माझी इच्छा आहे.”
पुढे तिला अश्रु अनावर होतात आणि ती भर वर्गात ढसा ढसा रडू लागते. तिला रडताना पाहून बाजूला बसलेली शिक्षिका तिच्याजवळ येतात आणि तिचे डोळे पुसतात. वर्गातील इतर विद्यार्थी मात्र तिला रडताना पाहून हसताना दिसत आहे. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक विद्यार्थी तिच्या बेस्ट फ्रेंड नियती जवळ जातो आणि तिला या विद्यार्थीनीबरोबर बोलण्यास सांगतो. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या शाळेतल्या मित्र मैत्रीणींची आठवण येईल.
हेही वाचा : Pune : पुण्यातील या सुंदर मंदिरात गेला आहात का? अप्रतिम सौंदर्य पाहून थक्क व्हाल, पाहा व्हिडीओ
nikkkhi_l या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नियतीचा खेळं” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पवित्र मन” तर एका युजरने लिहिलेय, “दुसऱ्याच्या भावना कळायला आपल्याकडेही मन असावं लागतं. दात काढणाऱ्यांना ते कळणार नाही.” आणखी एका युजरने लिहिलेय, “तिच्या आवाजात किती दु:ख आहे” एक युजर लिहितो, “ही एकतर्फी मैत्री आहे”