हवेतला गारठा वाढला की, अनेकांना चहा पिण्याची इच्छा होते. काम करताना झोप उडवण्यापासून ते सर्दी-खोकल्यासारख्या इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी चहा फायदेशीर ठरतो. बदलत्या काळानुसार चहाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर सध्या तंदुरी चहाची क्रेझ पाहायला मिळते आहे. हॉटेल, रेस्टोरंट्स, कॅफेमध्ये ही चहा वेगवेगळ्या पद्धतीने बनवून ग्राहकांना आकर्षित करण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो आहे. तर आज सोशल मीडियावर असाच एक तंदुरी चहा विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; जो पाहून नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग प्रभावित झाले आहेत. काय आहे या चहा विक्रेत्याची खासियत चला पाहू.

नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग आपल्या वक्तव्यांमुळे आणि ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. तर आज त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत रस्त्याच्या कडेला एक चहा विक्रेता स्टॉलवर तंदुरी चहा बनविताना दिसून आला आहे. डोक्यावर टोपी, जर्सी, असा पोशाख घालून विक्रेता चहासाठी खास गाणेसुद्धा गाताना दिसत आहे. चहा विक्रेत्याने कोणते गाणे गायले ते एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून पाहा.

हेही वाचा…VIDEO: फळे अन् भाजीपाला फ्रिजमध्ये ठेवणं योग्य की अयोग्य? ब्लॉगरने सांगितल्या ‘या’ खास टिप्स, एकदा बघाच

व्हिडीओ नक्की बघा :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, “गरम गरम मसालेवाली” हे गाणं गाऊन विक्रेता चहा बनवण्यास सुरुवात करतो. सर्वांत आधी चहा नेहमीसारखा बनवून किटलीमध्ये भरून ठेवला आहे; जेणेकरून तो गरम राहील. त्यानंतर तंदूर चहा बनविताना तंदूरमध्ये मातीचे कप ठेवून, ते गरम करण्यात येत आहेत. त्यानंतर या मातीच्या कपामध्ये चहा ओतताना विक्रेता त्याची अनोखी शैली दाखविताना दिसत आहे. तंदूर चहा बनविताना विक्रेत्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता, त्याचे गाणे गुणगुणणे नागालँडचे मंत्री तेमजेन यांना खूप आवडले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर नागालँडचे मंत्री तेमजेन यांनी हा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत @AlongImna या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच कॅप्शनमध्ये “शाम होने को आई, थोड़ी पी ली जाए क्या… चाय? ; अशी हिंदीमध्ये त्यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून चहा विक्रेत्याच्या अनोख्या स्टाईलचे विविध शब्दांत कौतुक करताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.