Nail Polish making video: नेलपॉलिशमुळे महिला आणि मुलींच्या स्टाइलला खास लुक मिळतो. नेलपॉलिशकडे आता फॅशन स्टाइल म्हणून पाहिले जाते. मुली वेगवेगळ्या प्रकारच्या नेलपॉलिशने नखं सजवतात. नेलपॉलिश हे नखांच्या सौंदर्यात आणखी भर टाकते. महिलांना वेगवेगळ्या रंगाचे नेल पॉलिश वापरायला आवडते. पण हीच नेलपॉलिश कशी बनवली जाते हे तुम्हाला माहितीये का? सोशल मीडियावर नेलपॉलिश फॅक्टरीमधला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नेलपॉलिश बनवताना दाखवले आहे. चला तर मग पाहुयात नेलपॉलिश बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया नक्की कशी असते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये नेलपॉलिश कशी बनवतात हे दाखवण्यात आले आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या रंगांचे मिश्रण कसे मिसळून नवीन रंग तयार केला जातो, त्याचप्रमाणे वेगवेगळे रंग कसे तयार केले जातात आणि मशीनद्वारे कसे एकत्र केले जाते. हे दाखवलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका पॅकेटमधून नेलपॉलिशच्या सुंदर बाटल्या काढल्या जातात, त्यात भरल्या जातात आणि बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात. नेलपॉलिश बनवण्याची ही प्रक्रिया पाहून तुम्हाला हेही कळेल की नेलपॉलिशची एक छोटी बाटली बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. शेवटी ती मुलगी नखांवर ती नेलपॉलिश लावताना दिसते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> राजस्थानच्या रणथंबोर उद्यानात शिकारीचा थरार; वाघीण आणि मगरीतील ‘चित्तथरारक लढाई’ VIDEO व्हायरल

हा व्हिडिओ thefoodiehat नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत १६.२ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर व्हिडिओला ३ लाख ३७ हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. यावर युजर्स आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत, एका यूजरने लिहिले… मला त्याला हातमोजे दान करायचे आहेत. दुसऱ्या यूजरने लिहिले… त्याचा वास खूप घाण आहे, हे लोक कसे काम करत आहेत. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… हे खूप कठीण काम आहे. एकानं सांगितलं की ही खूप मेहनत आहे. एकाने सांगितलं की, हे लोक दाखवणार नाहीत की त्यात किती रसायने मिसळली असतील, त्यानंतर ही नेलपॉलिश बनवली असेल.